शिक्रापूर – शिक्रापूर ( ता.शिरूर) येथे शिक्रापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येथील श्री भैरवनाथ मोफत वाचनालायास ऋषिकेश भाऊसाहेब केवटे यांनी वडीलांच्या कै. भाऊसाहेब नारायण केवटे द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अध्यात्मिक ग्रंथांचा मोठा संच वाचनालयास सप्रेम भेट देऊन वाचन चळवळीला प्रेरणा दिली असून नागरिकांना धार्मिक ग्रंथ साहित्य वाचण्यास मिळणार आहे.
शिक्रापूर व परिसरातील नागरिकांमध्ये वाचन चळवळ वाढावी रुजावी व सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक असणारी पुस्तके भेट स्वरूपात देण्यासाठी ग्रंथपाल संतोष काळे यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले होते त्याचाच एक भाग म्हणून शिक्रापूर येथील युवा उद्योजक ऋषिकेश भाऊसाहेब केवटे यांनी ग्रंथालयास वडीलांच्या कै. भाऊसाहेब नारायण केवटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अध्यात्मिक ग्रंथांचा मोठा संच वाचनालयास सप्रेम भेट देण्यात आला. याप्रसंगी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे , समता परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भुजबळ ,माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशजी भुजबळ यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व वाचन चळवळ वाढण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य उषाताई राऊत, सामाजिक कार्यकर्ते तानाजी राऊत, पोपटराव गायकवाड, बालवडे, ग्रामस्थ व तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आदर्श ग्रंथपाल संतोष दशरथ काळे यांनी केले.