शिक्रापूर ग्रामनगरीत सर्व दत्ता मंदिरात जयंती उत्साहात साजरी, श्री स्वामी समर्थ मंदिर व श्री दत्त मंदिर व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र शिक्रापूर येथे नेत्रदीपक पालखी सोहळा,भगवे झेंडे, हजारो महिला भगिनी व साधकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती साजरी
कोरेगाव भिमा – शिक्रापूर (ता.शिरूर) परिसरात दत्त मंदिरांमध्ये श्री दत्त जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करत मोठ्या आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून वृष्टी करण्यात येऊन मोठ्या आनंदाच्या ,उत्साहाच्या व भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली.
शिक्रापूर येथे श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त रस्त्यांवर आकर्षक रांगोळी काढण्यात येऊन, श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी सजवण्यात येऊन पारंपरिक वेशात महिला भगिनी व सेवेकरी सहभागी झाले होते.यावेळी महिला भगिनींनी मंगल कलश डोक्यावर घेत दत्त नामाचा दिगंबरा…. दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामघोष करण्यात येऊन फुगड्या खेळत आनंद साजरा केला.
शिक्रापूर येथील गावठाण, मलठण फाटा, बुधे वस्ती, क्षितिज विहार,बजरंग वाडी, मांढरे वस्ती, एस टी स्टँड, औरा सिटी, चासकमान कॉलनी व शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मोठ्या आनंदाच्या भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग शाखा शिक्रापूर (दिंडोरी प्रणित)तळेगाव ढमढेरे रस्त्यालगत असणाऱ्या केंद्रामध्ये भव्यदिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालखी स्वागतासाठी ठिकठिकाणी काढलेली आकर्षक रांगोळी, पारंपरिक वेशात महिला भगिनिंनी डोक्यावर पवित्र कलश घेत फुगड्यांचा फेर धरला तर सेवेकऱ्यांनी भगवे झेंडे घेत आनंद साजरा केला.