Saturday, July 27, 2024
Homeक्राइमशिकापुर पोलीसांची कोरेगाव भिमा येथील मटका अड्ड्यावर मोठी कारवाई

शिकापुर पोलीसांची कोरेगाव भिमा येथील मटका अड्ड्यावर मोठी कारवाई

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी वेषांतर करत खाजगी वाहनाने जात अचानक छापा मारून सहा अरोपिंसह ७३,८१५ रुपयांसह इतर साहित्य केले जप्त

कोरेगाव भीमा. – दिनांक २४ नोव्हेंबरकोरेगाव बिका येथील वढु रस्त्यालगत कल्याण नावाचा ज्ञानराज पार्क येथील प्लॉट मध्ये पत्राचे शेड मध्ये मुंबई, जुगार मटका अड्ड्यावर स्वतः पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी वेषांतर करत खाजगी वाहनाने जाऊन अचानक छापा मारत सहा आरोपिंसह ७३,८१५ रुपये व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या धडाकेबाज कार्यवाहीने अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना गुप्त बातमीदाराच्या माहिती नुसार प्रविण पाल (रा. वढु बु।।, ता. शिरूर जि.पुणे), स्वप्नील भाउसाहेब फडतरे, दत्तात्रय दशरथ कान्हुरकर, बाळासाहेब मारूती भवार, भरत वैज्यनाथ राउत, अरुण गणेश वानखेडे, गोविंद मारूती हाराळे(सर्व रा. कोरेगाव भिम ता. शिरूर जि.पुणे) हे आपले हस्तकाकरवी कल्याण जुगार नावाचा मटका खेळ पैसे घेवुन खेळवत असले बाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनचे पो हवा कारंडे , पोलीस नाईक पाटील , मळेकर , पोलीस कॉन्स्टेबल केदार असा पोलीस स्टाफ व पंच असे खाजगी वाहनाने मटका सुरू असलेल्या ठिकाणी पुस्तकातुन चिठ्या फाडुन देत असल्याचे खात्री झाल्यावर अचानक छापा घातला तेथे एकुण ६ जणांकडे ७३,८१५/- रू. किं.चे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य तसेच टि.व्ही.एस कंपनीची स्कुटी मोटारसायकल नं एम एच १२ एल.ई ६२०३ मिळुन आली त्यांच्यावर शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक विकास पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यत आला आहे.सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यासह पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक राकेश मळेकर, विकास पाटील, , पोलीस कॉन्स्टेबल आशोक केदार, प्रतीक जगताप, यांचे पथकाने केली आहे.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एकाच आठवड्यात दारू ,मटका धंद्यांवर केलेल्या धडक कार्यवाहीने अवैध धंद्यांवर चांगलाच वचक बसला असून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या धडाकेबाज कामावर सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!