Tuesday, July 16, 2024
Homeकृषिशिंदेवाडी येथे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

शिंदेवाडी येथे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

हवेली – हवेली तालुक्यातील शिंदेवाडी येथील गायरानावर हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोणते पाटील यांच्या हस्ते लक्ष्मितरू वृक्षाचे वृक्षारोपण करून वृक्ष लागवड करण्यात आली.नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून शाश्वत विकास फाउंडेशन ग्रामपंचायत शिंदेवाडी ग्रामपंचायत हिंगणगाव कृषी विभाग महसूल विभाग यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी २५१ वृक्षांचे वृक्षारोपण केले .

सकाळी रिमझिम पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या या पावसाचा आनंद घेत तहसीलदार तृप्ती कोलते पाटील व सर्व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला यावेळी महिलांनी वृक्षांना राखी बांधून वृक्षारोपण केले यावेळी वृक्षारोपण कार्यामध्ये अनमोल सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजचे संचालक अशोक घावटे , उपसंपादक राजेंद्र शिंदे, ग्रीन फाउंडेशन चे अध्यक्ष अमित जगताप,मंडलाधिकारी सय्यद मॅडम,शिंदेवाडीचे सरपंच संदीप जगताप, भवरापुरचे सरपंच सचिन सातव, सांगवीचे सरपंच नरसिंग लोले, हिंगण गावच्या सरपंच विद्या सागर थोरात , मंडल कृषी अधिकारी गणेश सुरवसे ,कृषी अधिकारी नीलम कासारे,शिंदेवाडीच्या ग्रामसेविका मोनिका माझीरे , हिंगणगावच्या ग्रामसेविका सुवर्णा लोंढे, आर्ट ऑफ लिविंगचे साधक अजित रणसिंग,अष्टापुरचे तलाठी सुधीर जायभाय, कोरेगाव मूळचे तलाठी प्रदीप जवळकर,सोरतापवाडीचे तलाठी निवृत्ती गवारी , शाश्वत विकास फाउंडेशनचे सदस्य रघुनाथ हरपळे ,विजय थोरात, राहुल थोरात, जयमाला जगताप यांच्यासह शाश्वत विकास फाउंडेशन अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!