Saturday, November 9, 2024
Homeताज्या बातम्याजनता शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवत आगामी निवडणुकीत मोठा बदल घडवणार, माझे...

जनता शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवत आगामी निवडणुकीत मोठा बदल घडवणार, माझे शरद पवार यांच्यावर मनापासून प्रेम – आमदार अशोक पवार

सावत्र आई सुध्दा पोराला जपते… विकास कामांच्या निधीची सत्ताधाऱ्यांकडून अडवणूक – आमदार अशोक पवार

आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांशी इमानदारी राखली – पि. के (आण्णा) गव्हाणे

कोरेगाव भिमा – वाजेवाडी (ता. शिरूर) सर्वसामान्य जनता शरद पवार यांचा शब्द अशा उंचीवर नेऊन ठेवणार की तिथपर्यंत ही पोचायची नाही हे शंभर टक्के. आगामी काळात सर्वसामान्य जनता मोठा फरक करून ठेवतील असा शिरूरच्या जनतेवर विश्वास व्यक्त करत माझे शरद पवार यांच्यावर मनापासून प्रेम आहे.मी समाधानी आहे.उद्या तिकीट मिळो ना मिळो मी पवार साहेबांसोबत एकनिष्ठ असल्याचे श्री क्षेत्र वढू बुद्रुक, वाजेवाडी, चौफुला या २१ कोटी ४५ लाखांच्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठा व्यक्त केली.

पूर्वी शिंदेंचे सरकार होते त्यांनी निधीची अडवणूक केली आता सत्तारुढांकडे २०० आमदार असूनही एका आमदाराने काय फरक पडणार ? तुमचे सुखाने चालले आहे. सभागृहातील मंजूर निधी बजेट पुस्तकात तरतूद असूनही विकास कामांचा निधी अडवला जातो यासाठी कोर्टात जाऊन लढा देत ४० कोटींच्या निधीचा आदेश मिळवावा लागतो.मागच्या बजेट मध्ये मोठा भोपळा मिळाला. सावत्र आईचे सुद्धा सावत्र मुलावर प्रेम असते त्याला चतकुर का होईना भाकर खाऊ घालते पण इथ सगळ वेगळ आहे.माझे कॉलेज पासून शरद पवार यांच्यावर प्रेम आहे.मी जीवनात समाधानी आहे. मी शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहे असे उद्गार आमदार अशोक यांनी काढले.

यापुढे बोलताना आमदार पवार यांनी चंदिगढ निवडणुकीतील गैरप्रकार, निवडणूक आयुक्तांना राजीनामा यावर भाष्य केले.छञपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या विषयी आराखडा, निधी याविषयी माहिती दिली.तसेच आकरा साखर कारखान्यांना कर्ज दिले.काही एन पि ए मध्ये असूनही कर्ज दिले.आता एकवीस कारखान्यांना पैसे देण्याचा प्रस्ताव दाखल आहे त्यात घोडगंगा साखर कारखान्याचे नाव आहे.दोन दिवसात कळेल.सहकार खात्याने फाईल मंजूर केल्याचं आहे.आता अर्थ खात्याकडे फाईल जाणार आहे त्याबाबत मी आशावादी आहे.बँक आज ना उद्या मदत करेल.विकासाच्या भूमिकेतून कामे पूर्ण करू.

आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांशी इमानदारी राखली – यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पि के ( आण्णा) गव्हाणे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवार साहेबांनी दुष्काळी शिरूर तालुक्याचे नंदनवन केले.श्री छञपती संभाजी महाराज समाधी परिसरात पूर्वी दुरावस्था होती. आमदार बापूसाहेब थिटे यांच्यामुळे सर्व एकत्र झाले सर्वांनी मदत केली.लोकांनी गाड्या दिल्या,साहित्य दिले व स्मारकात काम केले.त्यानंतर कित्येक आमदार झाले संभाजी महाराजांच्या नावाने राजकारण केले पण फक्त आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत आवाज उठवत निधी मिळवला व स्मारकाचा विषय मार्गी लावला. आमदार अशोक पवार सर्व सामान्यांचे काम करतात म्हणून कार्यसम्राट आहेत.
आमदार अशोक पवार यांनी इमानदारी सोडली नाही, शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले.ईमानदारी हाच खरेपणाचा पाया आहे.पूर्वी चिन्ह लोकांपर्यंत पोचवणे अवघड होते पण समाज माध्यमे प्रभावी असल्याने तुतारी चिन्ह सर्वांपर्यंत पोचले असून आणखी जनमानसात रुजविण्याचे काम करू आगामी काळात खासदार , आमदार ताकदीने निवडून आणून देत इट का जवाब पत्थर से देऊ असे म्हणत आमदार अशोक पवार यांच्या विकासकामे, एकनिष्ठता,ईमानदारी याबाबत विश्वास व्यक्त करत आमदार अशोक पवार व खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठीशी एकनिष्ठ असल्याचे पि. के. गव्हाणे यांनी ठामपणे सांगितले.

माजी सरपंच धर्मराज वाजे यांनी आमदार अशोक पवार यांनी वाजेवाडी साठी भरघोस असा कोटभर रुपये निधी देत विकासाचा आलेख उंचावत ठेवला असून नुसत्या मांजरे वाडी साठी ७० लाखांच्या वर निधी उपलब्ध करून दिला याबद्दल आमदार पवार यांचे आभार मानले.

यावेळी वाजेवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच सरपंच पूनम चौधरी ,वढू बुद्रुक ग्राम पंचायतीच्या सरपंच अंजली शिवले, आपटीचे सरपंच अतुल मुरकुटे, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे,पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच धर्मराज वाजे, विजय गव्हाणे, माजी सरपंच सारिका अंकुश शिवले, अनिल शिवले,माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य संदीप ढेरंगे, उपसरपंच रामदास मांजरे,ग्राम पंचायत सदस्या संगीता सावंत, जावेद इनामदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सागर गव्हाणे, माऊली थेऊरकर, प्रकाश बाबर, माजी उपसरपंच कुणाल बेंडभर, बबुशा ढेरंगे, रवींद्र फडतरे, पांडुरंग आरगडे हरीश वाजे,शिवाजी भोंडवे,रंगनाथ वाजे यांच्यासह कोरेगाव भिमा, पिंपळे जगताप, वाजेवाडी, वढू बुद्रुक आपटी,करंदी,वाडा पुनर्वसन, येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन गणेश शेळके यांनी केले होते. सूत्रसंचालन नितीन वाजे यांनि तर आभार माजी सरपंच अंकुश शिवले यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!