Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यावेळेचे अचूक नियोजन अभ्यासातील एकाग्रता ,निश्चित ध्येय व प्रयत्नांच्या सातत्याने स्पर्धा परीक्षेत...

वेळेचे अचूक नियोजन अभ्यासातील एकाग्रता ,निश्चित ध्येय व प्रयत्नांच्या सातत्याने स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता येते- पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख

बी जे एस महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ व्याख्यानास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद

विविध क्षेत्रातील अधिकारी व यशस्वी उद्योजक घडवण्यात मोलाचा वाटा असणारे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणारे बी जे एस महाविद्यालय

वाघोली ( ता.हवेली) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व बौद्धिक क्षमता मोठ्या प्रमाणावर असते ,प्रचंड कष्टाची तयारी असते याबरोबरच स्पर्धा परीक्षा करताना वेळेचे अचूक नियोजन अभ्यासातील एकाग्रता ,निश्चित ध्येय व प्रयत्नांच्या सातत्याने स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता येते असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी केले.

वाघोली ( ता.हवेली) येथील भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ स्पर्धा परीक्षा तयारी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक देशमुख यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संबंधित माहिती दिली. तसेच अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितली. त्याचबरोबरने अभ्यासाचे नियोजन कसे करावे, वेळेचे नियोजन कसे करावे, अभ्यासामधील एकाग्रता कशी वाढवावी याविषयी चर्चात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. हे करताना विद्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षेविषयी असणाऱ्या शंका व प्रश्न हे जाणून घेऊन अगदी सोप्या शब्दात त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यामधून काही नवीन विद्यार्थ्यांना देखील स्पर्धा परीक्षा व त्याचा अभ्यास करण्याची उत्सुकता निर्माण झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. ज्योतीराम मोरे यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. तसेच भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प विषयीची माहिती प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडवावे असे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा. सचिन कांबळे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. निखिल आगळे यांनी केले. या कार्यक्रमाची सभागृहातील व व्यासपीठ तयारी व बैठक व्यवस्था शिक्षकेतर कर्मचारी नवनाथ बटुळे यांनी केली. तसेच कार्यालयातील अनेकांची या प्रसंगी मदत लाभली.

या व्याख्यानाच्याप्रसंगी कला शाखेचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर गायकवाड, तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रमुख डॉ. रमेश गायकवाड, मराठी विभाग प्रमुख डॉ. सहदेव चव्हाण, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सिद्धेश्वर सांगोळे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. समीर मोरे, वनस्पती शास्त्राचे प्रमुख डॉ. डी एन पाटील तसेच परीक्षा विभागातील बाजीराव आवटे सर देखील उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करियरच्या बाबतीत मार्गदर्शन करत विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभे करणारे महाविद्यालय असून शिक्षण, संस्कार, उज्वल भविष्य व आत्मनिर्भर जागृत संवेदनशील नागरिक घडवणारे महाविद्यालय असा नावलौकिक असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवत असून महाविद्यालयात गुणवत्ता व बौद्धिक क्षमता विकास, आधुनिक कौशल्य विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सर्वांगीण विकासाबाबत बी .जे .एस.महाविद्यालय प्रयत्नशील आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!