Monday, October 14, 2024
Homeराजकारणविरोधकांनी साखर कारखाण्यावरील ४५० कोटींचे कर्ज सिद्ध केले तर राजकारण सोडेन अन्यथा...

विरोधकांनी साखर कारखाण्यावरील ४५० कोटींचे कर्ज सिद्ध केले तर राजकारण सोडेन अन्यथा तुम्ही राजकारण सोडा – ॲड. आमदार अशोक

सरपंच संगीता हरगुडे यांनी केले आमदार अशोक पवार यांच्यासह उमेदवारांचे स्वागत

कोरेगाव भीमा – दिनांक २९ ऑक्टोंबर

सणसवाडी ( ता.शिरूर) विरोधकांनी रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर ४५० कोटी कर्ज सिद्ध करून दाखवावे मी राजकारण सोडून देईल अन्यथा सिद्ध न करता आल्यास तुम्ही निवृत्ती घेऊन दाखवा असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले. तशीही यांना जनतेने पंचवीस वर्षे निवृत्ती दिली आहे .साखर कारखाना निवडणूक आपल्या चुलिशी व प्रपंचाशी निगडित आहे त्यामुळे ही निवडणूक आपली आहे.सध्या कारखान्यावर रेग्युलर कर्ज फेड आहे. एफ.आर. पि. थकवली नाही,दिवाळीत शेतकऱ्यांना साखर वाटप करायची तिथे राजकारण केले जाते, हा साखर कारखाना रावसाहेब दादा पवार यांचं मुल आहे ते मी असेपर्यंत मरू देणार नाही असे आमदार अशोक पवार यांनी प्रचार सभेत व्यक्त केले.जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मागील पंचवीस वर्षे विरोधकांना यश मिळाले नाही, जाणून बुजून अपप्रचार व संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे.कारखान्याने १०० कोटी रुपयांचा वीज प्रकल्प उभारला ज्यावेळी वीज द्यायची त्यावेळी सरकार बदलले पण वीज खरेदी करण्याचा करार करण्यास ३ वर्षे उशीर करण्यात आला उगाच ओरड करण्याला अर्थ नाही असे मत आमदार पवार यांनी व्यक्त केले.

आमदार अशोक पवार व साखर कारखान्याचे उमेदवार यांचे सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांनी शेतकरी पॅनलचे निवडणूक चिन्ह असलेली छत्री घेत अनोखे व उत्साहपूर्ण स्वागत केले.सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच संगीता नवनाथ हरगुडे या शेतकरी असून आजही शेतीतील कामे करत असतात शेतीशी नाळ असलेल्या सरपंचांनी असे अनोखे स्वागत केल्याने शेतकऱ्यांसह आमदार अशोक पवार यांनी आनंद व्यक्त केला.

सणसवाडी ( ता.शिरूर) येथील ग्राम दैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी उद्योगनगरी सणसवाडीच्या सरपंच संगीता नवनाथ हरगूडे यांनी आमदार अशोक पवार व उमेदवारांचे स्वागत केले.यावेळी शेतकऱ्यांच्या आयुष्याशी व प्रपंच्याशी निगडित असणाऱ्या निवडणुकीत शेतकरी पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्यात यावे असे आवाहन माजी संचालक दत्तात्रय पठाणराव हरगूडे यांनी व्यक्त केले.तसेच सणसवाडी ग्रामस्थांचे आमदारांवरील प्रेम मतपेटीतून दिसून येईल जास्तीत जास्त मतदान करत पॅनल विजयी करू अस विश्वास माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र काळे,रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार, शिरूर पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विजयराज दरेकर, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामदास दरेकर , चेअरमन कैलास दरेकर ,ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर , माजी चेअरमन सुहास दरेकर, माजी चेअरमन गजानन हरगुडे, बबुशा दरेकर, समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ,माजी उपसरपंच रमण दरेकर, नवनाथ विश्वनाथ हरगुडे, शिवाजी दरेकर , माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर , रमण दरेकर, प्रशांत दरेकर , नवनाथ दरेकर, सुभाष दरेकर, निलेश दरेकर, सुखदेव दरेकर, राविराज जुनवणे, विठ्ठल दरेकर,राहुल दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!