Monday, November 4, 2024
Homeताज्या बातम्याविधानसभा अध्यक्षांकडून नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

विधानसभा अध्यक्षांकडून नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई – विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्य ऋतुजा रमेश लटके यांना आज विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

विधानसभेचे सदस्य रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत विधानसभेवर नवनिर्वाचित विधानसभा सदस्य ऋतुजा रमेश लटके या निवडून आल्या आहेत.

विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब, विधानसभा सदस्य सुनिल प्रभू याचबरोबर विधानमंडळ सचिवालयाच्या उपसचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्षांचे सचिव राजेश तारवी, महेंद्र काज आणि सन्माननीय सदस्यांचे कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!