Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून त्यांचा विकास केल्यास हमखास यश मिळते - आशिष...

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून त्यांचा विकास केल्यास हमखास यश मिळते – आशिष दीक्षित

वाघोली- वाघोली (ता.हवेली) विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना स्वतःच्या क्षमता लक्षात घेऊन त्या क्षमतांचा विकास केल्यास हमखास यश मिळते असे प्रतिपादन भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली पुणे येथील विज्ञान विभागाच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ करिअर समुपदेशक आशिष दीक्षित यांनी केले.

यावेळी दिक्षित यांनी इयत्ता बारावी विज्ञान नंतरच्या विविध, नवनवीन करिअर क्षेत्रांसाठी आवश्यक क्षमता,मूलभूत ज्ञान,प्रवेश परीक्षा, नोकरी अथवा व्यवसाय संधी यांची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांचे विविध प्रश्नाचे निरसन केले. यावेळी प्राचार्य संतोष भंडारी , उपप्राचार्य पोपटराव गेठे, प्रा. अनुजा गडगे,प्रा. अमेय विसापुरकर ,प्रा.यशवंत घोगरे ,प्रा.उमाशंकर धुमनसुरे , प्रा.रूपाली साळुंके ,प्रा.सोनाली लोहारेकर , प्रा.प्रियंका दाभाडे , व इतर विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गणेश क्षीरसागर यांनी केले व प्रा.अनुजा गडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रा.बाबासाहेब गव्हाणे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!