Thursday, July 18, 2024
Homeस्थानिक वार्ताविठ्ठलवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने शिरूर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटला

विठ्ठलवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने शिरूर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटला

विठ्ठलवाडी ( ता.शिरूर) येथे भीमा नदीच्या पाण्याखाली गेलेला बंधारा

तळेगाव ढमढेरे – प्रतिनिधी जालिंदर आदक

तळेगाव ढमढेरे – दिनांक १४ जुलै

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे भिमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या बंधाऱ्यावर पाणी आल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) या गावाजवळूनच भीमा नदी वाहत असून शिरूर व दौंड तालुक्याला जोडणारा भिमा नदिवर बंधारा आहे. या बंधाऱ्यावरून दोन्ही तालुक्यांचा संपर्क होत असून सध्या सुरु असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे येथील भीमा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी बंधाऱ्यावरून वाहत आहे. या बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाने पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने भिमा नदीतून पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याने पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा रस्ता नदीच्या पाण्याखाली गेला आहे यामुळे शिरूर व दौंड तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. नदीकडेच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!