महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र पुणे आदर्श गाव विठ्ठलवाडीच्या विद्यमाने फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण सुरू
प्रतिनिधी मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – दिनांक १४ डिसेंबर विठ्ठलवाडी ( ता.शिरूर) येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे व ग्रामपंचायत विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांना फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कोर्स सुरु करण्यात आला असून या प्रशिक्षणाचे उद्घाटन मदनकुमार शेळके यांच्या हस्ते तर सरपंच सेवा संघाच्या उद्योजिका वंदना पोटे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी महाविद्यालय पुणे येथील सेवा निवृत्त अधिकारी भिमराव गायकवाड यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले .यामुळे विठ्ठलवाडी येथील महिलांना उद्योग शेत्रात काम करण्याची संधी झाली आहे. उद्घाटन प्रसंगी पुणे विभागाचे रीजनल ऑफीसर सुदाम थोटे , पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके यांनी मार्गदर्शन केले . शिरूर तालुका प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक सविता गवारे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या हाॅल मध्ये विठ्ठलवाडीच्या मजीलांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रशिक्षण महीनाभर चालणार आहे .यातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे असल्याचे शेळके यांनी सांगितले .
कार्यक्रमप्रसंगी सरपंच शंकर धुळे ,उपसरपंच ज्योती गवारे ,सदस्य सुनिता गवारे, ग्रामसेवक दत्तात्रय कुंभार, शिरूर राष्ट्रवादी काॅग्रेसचे सरचिटणीस सुनील गवारे, प्रशिक्षक रश्मीताई नेवासकर, तसेच विठ्ठलवाडी गावच्या महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.