Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रविज्ञान प्रदर्शनात सणसवाडी विद्यालय अव्वल.' आधुनिक अन्न वाढणी पद्धती' उपकरण व प्रश्नमंजुषा...

विज्ञान प्रदर्शनात सणसवाडी विद्यालय अव्वल.’ आधुनिक अन्न वाढणी पद्धती’ उपकरण व प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यात प्रथम

५० व्या तालुका स्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी विद्यालयातील ऋतुजा पंडित दरेकर (इ.९वी) व अपेक्षिता नवनाथ हरगुडे (इ.१२वी)या दोन विद्यार्थीनींनी तयार केलेल्या Advanced food serving system (आधुनिक अन्न वाढणी पद्धती) उपकरणांचा माध्यमिक विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक यांच्या गटाला प्रथम पारितोषिक मिळाले. या विद्यार्थीनींची उपकरणे व शिक्षक साहित्य जिल्हा विज्ञान प्रदर्शनात सादर होणार आहेत.

कोरेगाव भीमा – शिरुर येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, राज्य विज्ञान संस्था, नागपूर, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पंचायत समिती शिरूर आणि विजयमाला इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५० व्या तालुका स्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी विद्यालयातील ऋतुजा पंडित दरेकर (इ.९वी) व अपेक्षिता नवनाथ हरगुडे (इ.१२वी)या दोन विद्यार्थीनींनी तयार केलेल्या Advanced food serving system (आधुनिक अन्न वाढणी पद्धती) उपकरणांचा माध्यमिक विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक यांच्या गटाला प्रथम पारितोषिक मिळाले. या विद्यार्थीनींची उपकरणे व शिक्षक साहित्य जिल्हा विज्ञान प्रदर्शनात सादर होणार आहेत.

आरोग्य आणि स्वस्थता या विषयानुसार तयार करण्यात आलेल्या या उपकरणाच्या सहाय्याने सार्वजनिक मंगल कार्यालयात त्याचप्रमाणे मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी कमी वाढप्यांच्या मदतीने जेवण वाढता येणार असल्याने वाढप्यांवर व स्वच्छतेवर होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना जेष्ठ शास्त्रज्ञ के सी मोहिते, शिरुरचे गटविकास अधिकारी अजित देसाई, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, उपाध्यक्ष रामनाथ इथापे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, अशोक सरोदे यांच्या हस्ते तालुका प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला वाव देण्यासाठी विद्यालयात दरवर्षी विविध विज्ञान उपक्रम राबविण्यात आल्याने सणसवाडी विद्यालय दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात अव्वल ठरत असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य बी.डी.गोरे यांनी सांगितले.

विद्यार्थी व शिक्षक यांचे श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे व सर्व कार्यकारिणी सदस्य, सणसवाडीच्या सरपंच संगिता हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, शिरूर काँग्रेस आय कमिटीचे तालुका अध्यक्ष वैभव यादव व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!