Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्याविकासाच दुसरं नाव म्हणजे उद्योगनगरी सणसवाडी गाव

विकासाच दुसरं नाव म्हणजे उद्योगनगरी सणसवाडी गाव

सणसवाडी ग्राम पंचायतीने ( Sanaswadi gram panchayat) सौर ऊर्जेवर पथदिवे (Solar Energy street lighting) बसवत लाखो रुपयांचे वीजबिल वाचवले असून लवकरच ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या मोटारीसह (Water supply motor)ग्राम पंचायत कार्यालयही सौर उर्जेने झळकणार असून सणसवाडी ग्रामपंचायतीची झीरो एनर्जी कडे वाटचाल सुरू असून शिरूर तालुक्यातील विजबिलामध्ये मोठी कपात करणारी पहिली ग्रामपंचायत होण्याचा मिळणार मान मिळवण्यासाठी वाटचाल सुरू आहे.

कोरेगाव भीमा – शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर) ग्राम पंचायत म्हणजे विकासाचा ध्यास असणारी कृतिशील ग्राम पंचायत असून या गावाने विकासाचा आलेख नेहमी उंचावत ठेवला आहे.
विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेली प्राथमिक व माध्यमिक शाळा, नागरिकांच्या सुखसुविधा,शुद्ध पिण्याचे पाणी, प्रशस्त रस्ते , त्यावर बसवण्यात आलेले सौर दिवे यामुळे गावाचे नाव नेहमीच चर्चेत राहत असल्याने विकासाच दुसरं नाव म्हणजे उद्योगनगरी सणसवाडी गाव असे समीकरण तयार होत आहे. येथ ओळल ग्राम पंचायत सदस्य ग्रामस्थांना आणखी किती सुविधा देता येतील यावर नेहमी विचारविनिमय व कृती करत असतात.
उद्योगनगरी सणसवाडी गावचा एक अभिनव प्रयोग मात्र प्रशंसनीय व गौरोवास्पद आसुन यामुळे गावच्या नावात चार चाँद लागणार आहे. विजेच्या बिलाचा गंभीर प्रश्न ग्राम पंचायतींसमोर असतो पण थोड्याच दिवसात सणसवाडी ग्राम पंचायत ही झीरो एनर्जी असणारी ग्राम पंचायत होणार आहे.


या गावाने प्राथमिक स्वरूपात दोन सौर पथ दिवे बसविले त्यांचा लख्ख प्रकाश, चार्जिंग व त्यातून वाचणारे वीजबिल याबाबत अभ्यास केला व त्यानंतर पुणेनगर रस्ता ते चेअरमन वस्ती गावातील काही ठिकाणी एकूण ८५ सौर दिवे बसविले यामुळे लाखो रुपयांचे बिल वाचले तसेच लाईट नाही म्हणून पथदिवे बंद नसणार यामुळे रस्ता नेहमी प्रकाशमान राहणार आहे.
याबरोबरच सणसवाडी ग्राम गावातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मोटारी या पुढील काही आठवड्यांमध्ये सौर उर्जेवर चालणार आहे इतकेच काय तर ग्राम पंचायत कार्यालयही सौर उर्जेवर लवकरच कार्यान्वयित करण्यासाठी काम सुरु आहे.लवकरच शिरूर तालुक्यातील झीरो एनर्जी असणारी ग्राम पंचायत अस विक्रम करण्याकडे सणसवाडी ग्रामनगरीची वाटचाल सुरू आहे.

येथील सरपंच संगीता नवनाथ हरगुडे,उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, स्नेहल राजेश भुजबळ, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर,सागर दरेकर, राजेंद्र दरेकर, शशिकला सातपुते, सुवर्णा दरेकर, दगडू दरेकर, अक्षय कानडे , रुपाली दरेकर, ललिता दरेकर,.रामदास दरेकर, राहुल हरगुडे, दिपाली हरगुडे, भाऊसाहेब बाळणाथ पवने व ग्रामस्थ यांच्या एक विचाराने मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे.

सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पथदिव्यांची अगोदर ट्रायल घेण्यात आली.त्याचा चांगला फायदा दिसला यामुळे सर्वांनी विचार करत पथदिवे बसवले आता पाणी पुरवठा मोटारी व ग्राम पंचायत कार्यालय सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी काम करत आहोत – ग्रामसेवक बळणाथ पवणे

सणसवाडी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. विजेच्या लाईट बिलाचा प्रश्न गंभीर होता.यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आम्ही सौर पथदिवे व सौर ऊर्जेवर आधारित पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारी,ग्राम पंचायत कार्यालय यासाठी काम करत असून नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रभावी वापर करण्यासाठी ग्राम पंचायती समोरील वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावण्यात सर्वाचा मोलाचा वाटा आहे. सणसवाडी गाव हे सुखी ,समृद्ध व सर्वांगीण प्रगती करण्यासाठी सर्वजण मोलाचे काम करत आहेत.
– सरपंच संगीता नवनाथ हरगुडे


संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!