Saturday, May 25, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?वास्तवातील आदर्श मुलींपुढे ठेवा , आयुष्याचं स्वप्न साकार होईल - वसंत हंकारे

वास्तवातील आदर्श मुलींपुढे ठेवा , आयुष्याचं स्वप्न साकार होईल – वसंत हंकारे

कोरेगाव भीमा – सणसवाडी (त.शिरूर) ” चित्रपटातले नाही तर वास्तवातील कल्पना चावला, फातिमा शेख आणि पीटी उषा यांच्यासारखे आदर्श जोपर्यंत मुली मानत नाहीत तोपर्यंत मुलींची मानसिकता कणखर आणि वास्तववादी होणार नाही. यासाठी शाळेतील शिक्षकांपासून पालकांनी आणि आता समाजानेही मुला-मुलींसाठीचे आदर्श वास्तव जगाला देण्याची गरज आहे. ” असे मत व्याख्याते वसंत हंकारे यांनी सणसवाडी (ता. शिरूर) येथे व्यक्त केले.

   यावेळी व्याख्याते वसंत हंकारे यांनी मुलींना बाप नावाचं रसायन आयुष्यभर तुम्हाला सुखी करण्यासाठी संघर्ष करत असते , त्याच्या संघर्षाची माती होऊ द्यायची नाही पोरींनो बाप आभाळ आहे ते कुठेही झुकता काम नये अशी विविध भावनिक, प्रेरणादायी उदाहरणे देऊन उपस्थितांचे डोळे पाणावले तर कधी खळखळून हसवत प्रबोधन केले.

नवरात्रौत्सवात समाज प्रबोधनाचा सरपंच सुवर्णा दरेकर यांचा स्तुत्य उपक्रम –नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्या पुढाकाराने गावातील नरेश्वर विद्यालयात मुलींसाठी प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी हंकारे बोलत होते. सव्वा दोन तास स्थानिक, देश- विदेशातील अनेक घटना-घडामोडींचाआढावा घेत कुटुंब व्यवस्थेतील बदलांचाही मागोवा हंकारे यांनी या वेळी घेतला.

 कार्यक्रमाला सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, संस्थाध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, अॅड. विजयराज दरेकर, राजेंद्र दरेकर, रूपाली दरेकर, अनिल दरेकर, सतीश दरेकर, चंद्रकांत दरेकर, बाळासाहेब दरेकर, नवनाथ हरगुडे, किरण हरगुडे, नूतन हरगुडे, सारीका हरगुडे, वैशाली दरेकर, गणेश दरेकर, रामदास दरेकर, विकास दरेकर, अमित दरेकर, सागर हरगुडे, मुख्याध्यापक मेंगवडे आर.बी, उपशिक्षक रणसिंग के.ए., पर्यवेक्षक  देवकर जी. डी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!