Wednesday, July 24, 2024
Homeशिक्षणवाबळेवाडी शाळेतील तीन विद्यार्थी नवोदयसाठी पात्र

वाबळेवाडी शाळेतील तीन विद्यार्थी नवोदयसाठी पात्र

जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडीने राखली यशाची परंपरा कायम

तळेगाव ढमढेरे – महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीतील तब्बल तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय प्रवेशासाठी निवड झाली असून शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे. यात आदित्य चिंतामण परदेशी, पुनम संतोष साठे, करण तुकाराम सातपुते यांची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गोरख काळे व प्रतिभा पुंडे या मार्गदर्शक शिक्षकांचा व यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामस्थानी सन्मान केला. तसेच एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला.

राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली ‘झिरो एनर्जी स्कूल’ यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडीने 30 एप्रिल 2022 रोजी घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत शाळेचे तीन विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यात आदित्य चिंतामण परदेशी, पुनम संतोष साठे, करण तुकाराम सातपुते यांची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण सीबीएससी मध्ये अगदी मोफत होणार आहे. सदर परीक्षेसाठी कोरोनाची वातावरण असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या गोरख काळे आणि प्रतिभा पुंडे यांनी या मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. निकाल जाहीर होताच ग्रामस्थांनी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान केला.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनील पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गीते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!