Saturday, July 27, 2024
Homeशिक्षणवाबळेवाडी शाळेतील तब्बल २७ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले

वाबळेवाडी शाळेतील तब्बल २७ विद्यार्थी एनएमएमएस मध्ये चमकले

विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार असून असे एकूण १२ लाख ९६ हजार रुपये या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहेत.

जयश्री पलांडे आणि सुनिल पलांडे या दांपत्याचे दैदिप्यमान यश
कोरेगाव भीमा – वाबळेवाडी ( ता.शिरूर)


महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा वाबळेवाडीतील तब्बल २७ विद्यार्थ्यांची एनएमएमएस मध्ये निवड झाली असून १००%( टक्के) निकालासह शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व कंसात त्यांचे गुण
पार्थ बापू डफळ (१४६)प्रणव प्रकाश मांढरे(१४०)अथर्व रवींद्र डफळ (१३९)अपेक्षा निलेश मासळकर (१३६)हर्षदा जितेंद्र जोशी (१३०)हर्षदा प्रकाश वाबळे (१२९)अथर्व गणेश टेमगिरे (१२३)मयुर राजेंद्र गोकुळे (१२)श्रेया बाबाजी राऊत (१२१)अस्मिता ज्ञानेश्वर तांबे (१२०)संस्कृती शंकर पावसे (११७)सृष्टी अविनाश शेवाळे (११७)यशराज इंगळे (११६)पायल अरुण ठोंबरे (११६)समता गोकुळ मंडलिक (११५)किरण भाऊसाहेब तांबे (११५)अनुष्का मंगेश खैरे (११३)स्नेहा सुनिल जाधव (११०)मैथिली दत्तात्रय बारगळ (१०९)ओम महारुद्र काळे (१०८)ओम दिनेश पुजारी (१०७)नम्रता नामदेव राऊत (१०५)सृष्टी संतोष थिट्टे (१०३)सिद्धेश राजकुमार गवारी(१०२)ओम दयानंद कोरे (९५)जीवन नितीन नर्के (९४)यश वसुदेव जाधव (९२)या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तज्ञ जयश्री पलांडे आणि सुनील पलांडे यांनी मार्गदर्शन केले आहे.सदर परीक्षेसाठी कोरोनाचे वातावरण असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या पलांडे दाम्पत्याने या मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि ‘झिरो एनर्जी स्कूल’ यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद आदर्श शाळा, वाबळेवाडीतील तब्बल २७ विद्यार्थ्यांची एनएमएमएस मध्ये निवड होऊन शाळेला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यात या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार असून असे एकूण १२ लाख ९६ हजार रुपये या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहेत.
निकाल जाहीर होताच ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचा शाळेकडून शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष सुरेखा वाबळे शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे,शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनील पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गीते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर, आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!