Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांनी वाबळेवाडी येथे घेतली वाबळे कुटुंबीयांची भेट

आमदार अशोक पवार यांनी वाबळेवाडी येथे घेतली वाबळे कुटुंबीयांची भेट

आमदार अशोक पवार यांनी कै. लताबाई काशिनाथ वाबळे यांच्या दुःखद निधन प्रसंगी वाबळे कुटुंबीयांची सांत्वनपर घेतली भेट

कोरेगांव भीमा – वाबळेवाडी ( ता.शिरूर) येथिल प्रसिद्ध शेतकरी देविदास काशिनाथ वाबळे यांच्या मातोश्री व काळूराम साईराम वाबळे यांच्या चुलती कै. लताबाई काशिनाथ वाबळे दिनांक २५ जुलै रोजी निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता आमदार अशोक पवार यांना समजताच त्यांनी मुलगा देविदास काशिनाथ वाबळे, रघुनाथ एकनाथ वाबळे, काळुराम साईनाथ वाबळे, श्रीमती पमा सत्यवान सोनवणे, श्रीमती सुभाद्राबाई वाबळे,ललिता वाबळे
कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.यावेळी कुटुंबीय,नातेवाईक, वाबळेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
कुटुंबातील मातोश्री व ज्येष्ठ आधारस्तंभ असणाऱ्या व्यक्तींचे निधन झाल्याने शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाबळे कुटुंबीयांची सांत्वन केल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होणारे,माणुसकी जपणारे, सहृदय माणूस असून त्यांच्या भेट देण्याने समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली.

यावेळी आमदार अशोक पवार, विश्वास ढमढेरे, संभाजी भुजबळ,अमित राऊत,रघुनाथ वाबळे, तेजस वाबळे, अभिषेक वाबळे, चंद्रकांत वाबळे, व वाबळे कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!