Thursday, October 10, 2024
Homeशिक्षणवाबळेवाडीच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड

वाबळेवाडीच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड

  • शाळेने राखली उज्वल यशाची परंपरा कायम

शिक्रापूर – दिनांक ११ ऑगस्ट

महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीतील दोन विद्यार्थ्यांची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर निवड झाली असून शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यात वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात सिद्धी शामकांत माळी हिने द्वितीय , तर सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या गटात झालेल्या वेशभूशा स्पर्धेत मधुरा उत्तम काळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. या दोघींनाही सातवीच्या वर्गशिक्षिका जयश्री पालांडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली ‘झिरो एनर्जी स्कूल’ यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तालुका पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. यात केंद्रातील 18 शाळांनी सहभाग नोंदवला. यात वाबळेवाडीच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड होऊन शाळेला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या विद्यार्थ्यांची पुढील जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा वाबळे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

निकाल जाहीर होताच ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचा शाळेकडून मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!