एस टी च्या चाकाखाली घुसली दुचाकी तर एस टी रस्ता दुभाजकावर शिरली
कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन (ता.शिरूर) येथे पुणे नगर महामार्गावर एस टी बस व दुचाकी यांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दुचाकीवरील एकजण ठार झाला आहे तर एकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अपघाताची भीषणता मोठी होती दुचाकी एस टी च्या चाकाखाली असून एस टी रस्ता दुभाजकावर शिरली असून एस टीचे पुढील भाग तुटला असून जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने दवाखान्यात नेले आहे.मृताचे नाव मल्हारी साधू वाडेकर, (वय २५) सध्या राहणार कोरेगाव भिमा, मुळगाव जाजनुर , ता.निलंगा, जि लातूर असे आहे.
वाडा पुनर्वसन येथील चौकात भीषण अपघात झाला असून एस ती क्रमांक एम एच ०९ ई एम ९६५२ असून शाईन दुचाकी क्रमांक एम एच १२ टी एफ ३३४० या दुचाकीवरील एकजण मृत्यू पावका तर एकजण जखमी झाला असून एस टी बस ड्रायव्हर व कंडक्टर जखमी झाले असून एस टी बस रस्ता बुभाजकावर गेली यामुळे मोठ्या आवाज झाला यामुळे परिसरातील नागरिक व वाहन चालक मोठ्या संख्येने येथे जमा झाले जखमींना तातडीने नागरिकांनी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून जखमी व मृत इसमाची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.
याबाबत अधिकचा तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून महामार्ग अपघात पोलीस यंत्रणा संबधित ठिकाणी दाखल होत आहे.
वाडा पुनर्वसन फाटा हा मृत्यूचा स्पॉट बनत असुन मोठ्या प्रमाणात युवक व नागरिकांचे प्राण जात आहे.येथे मोठा हायमास्ट बसवण्याची मागणी सातत्याने होत आहे पण बांधकाम विभाग व इतर शासकीय विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे.त्यांच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणखी अपघात होऊन नागरिकांचे प्राण जाण्याची वाट पाहत आहे काय ? असा उद्विग्न प्रश्न निर्माण होत असून तातडीने येथे मोठा हायमास्ट दिवा बसवण्याची मागणी होत आहे.