Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्यावाडा पुनर्वसन येथे बसवली १०० एच पि ची डीपि

वाडा पुनर्वसन येथे बसवली १०० एच पि ची डीपि

नागरिकांची वारंवार लाईट जाण्यापासून होणार सुटका

कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन ( ता.शिरूर) येथील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली १०० एच पि डीपी बसवल्याने वारंवार लाईट जाण्याच्या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली असून विद्यार्थी व गृहिणींनी याबाबत समाधान व्यक्त केले असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.

याबाबत सरपंच योगिता नितीन ढोरे व ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार व एस सी बी मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यांनी आभार मानत आनंद व्यक्त केला. १०० एच पि ची डिपी बसवण्याठी आमदार अशोक पवार, एस सी बी चे अधिकारी नितीन महाजन, माजी सरपंच नवनाथ माळी व तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन ढोरे ,सरपंच योगिता नितीन ढोरे , ग्राम पंचायत सदस्य व वायरमन पांडुरंग बगाटे व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न करत वाडा पुनर्वसन गावाची समस्या सोडवली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!