Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्यावाडा पुनर्वसन फाट्यावर बस गेली चारीत.....

वाडा पुनर्वसन फाट्यावर बस गेली चारीत…..

बांधकाम विभागाचा गलथान कारभार थांबणार तरी कधी….

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (वाडा पुनर्वसन) येथे ट्रॅव्हल बस पुणे नगर महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या चारीत गेली असून सुदैवाने अपघातात कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसून वाहतूक सुरळीत सुरू आहे.एका आठवड्याच्या आत येथे ट्रॅव्हल बसचा अपघात झाला असून बांधकाम विभागाचा गलथान कारभार याला कारणीभूत ठरत आहे.

वाडा पुनर्वसन फाट्यावर एक ट्रॅव्हल बसचा ( ओ डी १७ जी १५४०) अपघात झाला यावेळी बसमध्ये २० प्रवाशी प्रवास करत असल्याची प्राथमिक मिळाली असून कोणीही जखमी नाही.पुणे नगर महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या चारीत बस गेल्याने एका छोटया टेकाडाला टेकल्याने बस जाग्यावर थांबली शेजारी वीज महामंडळाचे पोल होते त्यांना धक्का नाही अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

वाडा पुनर्वसन फाटा अपघात क्षेत्र ठरत असून आठ दिवसांपूर्वीच येथे एस टी व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला होता यावेळी रस्ता दुभाजकाचे मोठे नुकसान झाले असून हे दुभाजक नीट करणेसाठी बांधकाम विभागाकडे वेळ नाही की इच्छाशक्ती नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.   येथे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचे जीव जात आहे कोणी जखमी होत आहे पण बांधकाम विभाग येथे स्पीड ब्रेकर, रंबलर व स्ट्रीट लाईट व सूचना फलक केंव्हा बसवणार असा उद्विग्न प्रश्न निर्माण होत असून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ बांधकाम विभाग किती दिवस पाहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!