Friday, June 21, 2024
Homeक्राइमवाडा पुनर्वसन फाट्यावर दुहेरी अपघात एकाच्या डोक्याला मार

वाडा पुनर्वसन फाट्यावर दुहेरी अपघात एकाच्या डोक्याला मार

मदतीसाठी गेलेल्या दुसऱ्या एकाला दुचाकी वाल्याची धडक

कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन (ता.शिरूर) येथे एका पादाचारीला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला मार लागला. असून मोठ्या प्रमाणावर रक्त स्त्राव पुणे नगर महामार्गावर सांडले होते.अपघात झाल्याचे पाहण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या एका इसमाला दुचाकी वाल्याने धडक दिल्याने दुहेरी अपघात झाला आहे.

यावेळी चारचाकी प्रथम दर्शनी पाहणाऱ्यांनी आय ट्वेण्टी सदृश गाडी असल्याचे सांगण्यात आले असून वाडा पुनर्वसन येथे दुहेरी अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून वाडा पुनर्वसन येथील कॉर्नर हा अपघात प्रवन झाला असून याबाबत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज आहे. अपघातात जगन्नाथ अण्णा कुऱ्हाडे ( वय ४५) सध्या राहणार रांजणगाव येथे रहिवासी आहेत. चारचाकी वाहनाच तपास करण्यात येत आहे. अपघाताबाबत माहिती कळताच रुग्णवाहिका चालक सोमनाथ मुळे यांनी तातडीने जात जखमीला उपचारासाठी रुग्णवाहिकेत शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.

एक पादाचाऱ्याला आय ट्वेण्टी सदृश गाडीने उडवल्याने तो पुणे नगर महामार्गावर पडला होता त्यावेळी त्याला पाहण्यासाठी एक दुसरा गेला त्यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीने त्याला धडक दिल्याने दुहेरी अपघात झाला असून वाडा पुनर्वसन फाट्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.महामार्ग विभाग व पोलीस प्रशासन याबाबत काय कार्यवाही करेल ज्यामुळे नागरिकांच्या जिवांशी होणारा खेळ थांबणार का ? अपघाताचे प्रमाण कमी होईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!