Friday, June 21, 2024
Homeन्यायमहिलावाडा पुनर्वसन उपसरपंचपदी स्वाती परशुराम माळी यांची बिनविरोध निवड

वाडा पुनर्वसन उपसरपंचपदी स्वाती परशुराम माळी यांची बिनविरोध निवड

कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन ( ता.शिरूर) येथील वाडा पुनर्वसन ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती परशुराम माळी यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामस्थांनी व ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी सरपंच वसंत भोकटे, सुरेखा ढोरे, माजी सरपंच नवनाथ माळी, योगिता नितीन ढोरे, मंगेश अशोक पवार , वैष्णवी हत्ते, ग्रामसेवक विमल आव्हाड यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सुरेखा ढोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदरचे पद रिक्त झाले होते.यावेळी गावच्या विकासाला व एकीला प्राधान्य देत सर्व ग्रामस्थांनी ही उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करत एक अनोखा आदर्श ठेवला आहे.

वाडा पुनर्वसन हे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असते आमदार पवार यांनीही या गावाला मोठ्या प्रमाणात निधी देत विकास कामे करत असतात. निवडणुकीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची कृतज्ञता माजी सरपंच नवनाथ माळी यांनी दिली.

यावेळी माजी उपसरपंच सचिन माळी , राजेश हत्ते, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नितीन ढोरे, बबलू पंजाबी , चंद्रकांत माळी, मोहन माळी संपत माळी, अविनाश कुंभार , बाळासाहेब ढोरे, माजी अध्यक्ष प्रकाश माळी, राधिका माळी,पल्लवी माळी, मालन भुजबळ , छाया नायकुडे ,मंगल माळी, ज्योती हत्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन माजी सरपंच सूरेश माळी यांनी व्यक्त केली.

वाडा पुनर्वसन गावच्या विकासाला महत्व देण्यात येणार असून नागरिकांना सर्व सोयी सुविधा देण्यासह महिलांच्या सबलीकरणासाठी व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. – नवनियुक्त उपसरपंच स्वाती परशुराम माळी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!