Thursday, June 20, 2024
Homeइतरवाडापुनर्वसन ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर

वाडापुनर्वसन ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर नामंजूर

कोरेगाव भिमा – शिरुर तालुक्यातील वाडापुनर्वसन ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर ३/४ बहुमताअभावी नामंजूर करण्यात आला.

सात सदस्यसंख्या असलेल्या वाडापुनर्वसन ग्रामपंचायतीच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांनी २१ मार्च रोजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, सदस्यांना अपमानास्पद वागणुक देतात, लोकशाही पद्धतीने घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यास सरपंच टाळाटाळ करतात, त्यामुळे ग्रामस्थांच हित जोपासणे कठीण झाल्याचे सांगत सरपंच योगिता नितीन ढोरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. तर सरपंच योगिता नितीन ढोरे यांनीही आपली बाजु मांडून हे सर्व आरोप नाकारले, तसेच सर्व सदस्यांना विश्वासात घेवूनच नागरीहिताची विविध विकासकामे करण्यासाठी लोकशाही पद्धतीने कारभार करीत असल्याचे नमुद केले.

दरम्यान आज तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी उपसरपंच संपत नामदेव माळी, सदस्य वसंत किसन भोकटे, सदस्या स्वाती परशुराम माळी,गिता अनमोल पंजाबी, वैष्णवी राजेश हत्ते यांनी ठरावाच्या बाजुने तर सरपंच सौ.योगिता नितीन ढोरे यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी एकुण सहा सदस्यांची आवश्यकता होती, मात्र एक सदस्य मंगेश अशोक पवार हे गैरहजर असल्याने हा अविश्वास ठराव अखेर ३/४ बहुमताअभावी फेटाळण्यात आला.

यापुढील काळातही नागरी हिताची विविध विकासकामे करण्यासाठी लोकशाही पद्धतीने कारभार करणार असल्याचे सरपंच योगिता ढोरे यांनी अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!