Saturday, July 27, 2024
Homeक्राइमवाडागाव डिंग्रजवाडी रस्त्यावरील अपघातात १४ व १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

वाडागाव डिंग्रजवाडी रस्त्यावरील अपघातात १४ व १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

कोरेगाव भीमा- वाडागाव पुनर्वसन(ता. शिरूर) येथील वाडागाव – डिंग्रजवाडी रस्त्यावरुन दुचाकी हून जात असताना दुसऱ्या दुचाकीची धडक बसून महादेव दत्तात्रय कांबळे व सिद्धेश शिंदे या दोघांचा मृत्यू तर ओंकार चंद्रकांत कंदारे हा युवक जखमी झाल्याची घटना घडली असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ओंकार चंद्रकांत कंदारे या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाडागाव (ता. शिरूर) येथील वाडागाव डिंग्रजवाडी रस्त्यावरुन महादेव कांबळे व सिद्धेश शिंदे हे दोघे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ जि. पी. २०३६ या दुचाकीहून जात असताना ओंकार कंदारे हा युवक त्याच्या दुचाकीहून भरधाव वेगाने आला, त्यावेळी त्याची धडक महादेव कांबळे यांच्या दुचाकीला बसून अपघात झाला यावेळी महादेव दत्तात्रय कांबळे (वय १४ वर्षे) रा. कोरेगाव भीमा ( पंढरीनाथ नगर) याचा जागीच मृत्यू झाला तर सिद्धेश बाळासाहेब शिंदे (वय १७ वर्षे) याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तसेच ओंकार चंद्रकांत कंदारे रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे हा जखमी झाला असून याबाबत अमोल महादेव कांबळे (वय ३३ वर्षे) रा. कोरेगाव भीमा (पंढरीनाथ नगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ओंकार चंद्रकांत कंदारे या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!