कोरेगाव भीमा – दिनांक २० एप्रिल
वाघोली ( ता.हवेली) येथील दुकानांना आग लागली असून यामध्ये आठ ते दहा दुकाने आगीच्या भक्ष्य स्थानी पडली असून अग्नी शमन दलासह नागरिकांच्या मदतीने सदर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप समजले नसून पुणे नगर महामार्गावर हा आगीचा थरार काही काळ सुरू होता यामुळे वाहतुकीस काही काळ अडथळा निर्माण झाला होता.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलातील 2 बंब व पाण्याचे टँकर तातडीने घटना स्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत झाली असून पुढील मोठा अनर्थ टळला आहे.फर्निचर दुकानासह इतर दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.या आगीमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.