Tuesday, September 10, 2024
Homeइतरवाघोली येथील बीजेएस विद्यालयातील मुलींना मालाबार गोल्ड अँड डायमंड तर्फे १७ लाख...

वाघोली येथील बीजेएस विद्यालयातील मुलींना मालाबार गोल्ड अँड डायमंड तर्फे १७ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

मागील तीन वर्षापासून बी जे एस च्या सुमारे चारशे विद्यार्थिनींनी सुमारे चाळीस लाख रुपये शिष्यवृत्ती चा लाभ

वाघोली (ता.हवेली) येथील भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयातील मुलींना मालाबार गोल्ड अँड डायमंड तर्फे १७ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण सोहळा मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला.एकूण शिष्यवृत्ती रक्कम २७ लाख रुपयांची असून यातील वाघोली येथील विद्यार्थिनींना १७ लाखांची शिष्यवृत्ती मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.

मलाबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी फोनिक्स मॉल विमान नगर येथील शोरूमचे स्टोअर हेड जेरीस सर, स्टोअर मॅनेजर बोस मॅडम, श्री विजय बिरारी उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बीजेएसच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, प्राचार्य संतोष भंडारी , कर्नल उपेंद्र विसाळ, वर्षा विसाळ, प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे,पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उप प्राचार्य पोपटराव गेठे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य संजय गायकवाड उपस्थित होते.

प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी मालाबार गोल्ड तर्फे मागील दोन वर्षापासून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांनीना मिळत असून यामुळे विद्यार्थिनींची सर्वांगीण प्रगती होत असून स्पर्धात्मक परीक्षांचा आत्मविश्वास वाढण्यास मदातभित असल्याचे सांगत मालाबारचे आभार मानले. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेऊन विद्यार्थिनींना त्यांचे गुण व उत्पन्नाचे आधारे गुणांकन करून शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे सांगितले. मागील तीन वर्षापासून बी जे एस च्या सुमारे चारशे विद्यार्थिनींनी सुमारे चाळीस लाख रुपये शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेला आहे.

यावेळी प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड यांनी विद्यार्थिनींना येणाऱ्या संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जा आणि आपली ध्येये पूर्ण करा. ध्येय पूर्ण करण्यासाठी भारतीय जैन संघटना नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा आत्मविश्वास मुलींना दिला.यावेळेस विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली तसेच काही पालक, शिक्षक व विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त करून मालाबार तसेच ही शिष्यवृत्ती मिळवून दिल्याबद्दल भारतीय जैन संघटना विद्यालयाचे आभार मानले. यावेळेस बीजेएसचा माजी विद्यार्थी विनोद गव्हाणे यास नुकतेच अमेरिका येथे नोकरीसाठी संधी मिळाल्याबद्दल अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राणी तोरडमल यांनी तर आभार प्रा.प्रियांका डोंगरे यांनी केले. यावेळेस सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!