Thursday, October 10, 2024
Homeक्राइमवाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेणाऱ्या तरुणाचे प्रकरण लोणीकंद पोलिसांना भोवले…तीन जणांचे निलंबन

वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेणाऱ्या तरुणाचे प्रकरण लोणीकंद पोलिसांना भोवले…तीन जणांचे निलंबन

पुणे – पुण्यातील वाघोली पोलीस चौकिसमोर तरुणाने पेटवून घेतल्याचे प्रकरण लोणीकंद पोलिसांना चांगलेच भोवले आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या बदली नंतर आता लोणीकंद पोलीस ठाण्यातील  अशोक घेगडे, कैलास उगडे आणि महेंद्र शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नावे आहेत.

पुण्यात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने पोलीस कारवाई करत नसल्याने  पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपींवर गुन्हा दखल केला. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली.याप्रकरणी कर्तव्यात कसूर केली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात  आले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!