Friday, July 26, 2024
Homeइतरवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नियमक मंडळाच्या संचालकपदी आमदार अशोक पवार यांची बिनविरोध निवड

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नियमक मंडळाच्या संचालकपदी आमदार अशोक पवार यांची बिनविरोध निवड

कोरेगाव भीमा – मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली असून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या मतदार संघ क्र . ४ मधून शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे पत्र महासंचालक तथा निवडणूक समिती अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी दिले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली मतदार संघ क्र . ४ मधून आमदार अशोक पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे महासंचालक तथा निवडणूक समिती अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी केली . शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार अशोक पवार यांचे सहकारी साखर कारखाना उद्योगातील आदर्शवत कामकाज बघून त्याची निवड झाली आहे . त्या पाठोपाठ अंतराष्ट्रीय संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे .

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार , साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर , सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदींनी आमदार पवार यांचे अभिनंदन केले .

या निवडीने शिरूर हवेली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!