Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यावर्षाकाठी ३० हजार रुग्णांना केवळ ४०० रुपयांत डायलेसीस करत जिवनदान देणारे शिरुरचे...

वर्षाकाठी ३० हजार रुग्णांना केवळ ४०० रुपयांत डायलेसीस करत जिवनदान देणारे शिरुरचे अवलिया : प्रफुल्ल कोठारी

कोरेगाव भीमा – पुणे शहर आणि जिल्ह्यातील दररोज सुमारे ८० किडनी निकामी झालेल्या रुग्णांना केवळ सरासरी ४०० रुपयांत संपूर्ण डायलेसीस करणारे प्रफुल्ल कोठारी हे अवलिया आहेत, मुळ कवठे-येमाई (ता.शिरूर) येथील. वडीलांपासून पुण्यातील वडगाव-शेरी परिसरात उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक झालेले कोठारी दररोज ८० रुग्णांच्या सरासरीने गेली पाच वर्षात प्रतीवर्षी सुमारे तीस हजारांच्या वर रुग्णांना नवजीवन देत असून नुकतेच त्यांनी आता पनवेल (जि.रायगड) येथेही नुकतेच एक पनवेल रोटरीसोबत सहावे डायलेसीस सेंटर सुरू केले आहे.

दु:ख, वेदना आपल्या प्रत्येकाच्या समोर चालूच असतात मात्र ती दिसण्यासाठी जी व्याकुळता आणि पर-वेदनाशांतीची आस असावी लागते ती खुपच कमी जणांकडे असते. त्यातीलच एक वडगाव-शेरी (पुणे) येथील प्रफुल्ल कोठारी. साधारण ६० वर्षांपूर्वी शांतिलालजी कोठारी हे कवठे-येमाई गाव सोडून पुण्यात गुळाच्या व्यवसायाच्या निमित्ताने आले. पुढे नाशिक येथे आपले व्यावसायिक नशिब आजमावऊन परत ते परत सन १९६८ मध्ये पुण्यात परतून किराणा व्यवसायात ते रमले. याच दरम्यान त्यांचे चिरंजीव प्रफुल्ल यांनी बी कॉम पर्यंत शिक्षण करताना किराणा व्यवसायातही वडीलांना हातभार लावला. सन २००९ पासून मात्र ते बांधकाम व्यवसायात चांगलेच स्थिरस्थावर झाले अन सन २०१५ मध्ये सामाजिक देणगी द्यावी म्हणून ते पुण्यातील अरण्येश्वर येथील श्री गुरु गौतम मुनी चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक सतीश बनवट यांचे डायलेसीस सेंटरमध्ये गेले. यावेळी तिथे डायलेसीसविना अर्धमेला असा एक रुग्ण आलेला आणि चार तासांनी अगदी तरतरीत होवून हसत बाहेर पडलेला त्यांनी पाहिला. याच वेळी त्यांना बनवट यांनी स्वत:चे सवलतीतील डायलेसीस सेंटर सुरू करण्याचा आदेश दिला, अन आई सौ.शकुंतला आणि वडिल शांतिलालजी यांच्या नावाने पुढील वर्षभरात वडगाव-शेरी येथे कोठारी चॅरीटेबल ट्रस्टचे केवळ ६०० रुपयांत डायलेसीसच्या आठ मशिनरींसह सेंटर सुरू झाले. पत्नी सौ.दीपाली, मुलगा मितेश आणि मुलगी करिश्मा यांनीही उत्तम साथ दिली अन हे त्यांचे काम व्यापक होत चालले आहे.

आवश्यक औषधे, बी-बॅग (पावडर फॉर्ममध्ये), आठशे रुपयांचे रक्तवाढीचे इंजेक्शन, डायलायझर (फिल्टर्स), ट्यूबींग व इतर साहित्य यांच्यासह जवळपास चार तासांची डायलेसीसची प्रक्रीया या सेंटरमध्ये जगातील सर्वात आत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाच्या आठ मशिन्सद्वारे ते करतात, तर पुणे महापालिकेच्या येरवडा येथील राजिव गांधी रुग्णालयात महापलिकेच्या योजनेतून पूर्ण मोफत डायलेसीस केले जाते. पुणे शहरात तीन ठिकाणी तर ग्रामिण रुग्णांसाठी जेजुरी येथे श्री मार्तंड देवस्थान मार्फत सुरू असलेल्या सर्व एकुण चार डायलेसीस सेंटरद्वारे दररोज ८० रुग्णांना काहीना मोफत, काहीना रु.१०० व रु.६०० अशा सेंटरच्या धोरणानुसार ठरलेल्या सरासरी ४०० रुपये दरात ते संपूर्ण डायलेसीस करतात.

प्रफुल्ल कोठारी यांच्या कोठारी चॅरीटेबल ट्रस्टकडून चालविली जाणारी डायलेसीस सेंटर्स व त्यांचे पत्ते – १. कोठारी चॅरीटेबल ट्रस्ट, वडगाव-शेरी, पुणे : ८ मशिन्सद्वारे २. पुणे महापालिकेचे राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा पुणे : १० मशिन्सवारे ३. ओम जयानंद डायलेसीस सेंटर, थेरगाव-पुणे : ८ मशिन्सद्वारे ४. मार्तंड देवस्थान ट्रस्ट, जेजुरी, ता.पुरंदर, जि.पुणे : १० मशिन्सद्वारे ५. रोटरी क्लब, पनवेल, जि.रायगड : ६ मशिन्स

डायलेसीस सेंटरप्रमाणे सध्याची रुग्ण संख्या – डायलेसीस मशिन संख्या – डायलेसीस सवलतीचे दर१. वडगाव शेरी (पुणे) – दररोज सरासरी १६ पेशंट : ८ मशिन्स – सवलतीचे दर रु.६०० फक्त. २. येरवडा (पुणे) – दररोज सरासरी २५ पेशंट : १० मशिन्स – सवलतीचे दर : मोफत (पुणे महापालिकेच्या योजनेतून)३. थेरगाव (पुणे) – दररोज सरासरी १५ पेशंट : ८ मशिन्स – सवलतीचे दर रु.६०० फक्त.(जैन कॉन्फ्रेंस यांच्या सहकार्यने)४. मार्तंड देवस्थान ट्रस्ट,जेजुरी (ता.पुरंदर, जि.पुणे) मार्फत दररोज सरासरी २२ पेशंट : १० मशिन्स – सवलतीचे दर रु.१०० फक्त.(मार्तंड देवस्थान ट्रस्ट,यांच्या सहकार्यने)५. रोटरी संस्था पनवेल (जि.रायगड), – नुकतेच उद्घाटन झाले : ६ मशिन्स – सवलतीचे दर रु.६०० फक्त.

२४ तास चार नेफ्रॉलिजीस्ट..! – डॉ.गणेश म्हेत्रेस या मुख्य नेफ्रॉलिजीस्टच्या मार्गदर्शनाखाली डॉ.ए.व्ही.कोहकडे, डॉ.सचिन पाटील व डॉ.महेश रोकडे ही चार जणांची टिम संपूर्ण पाच डायलेसीस सेंटर्स आणि दरररोजच्या सर्व पेशंटचा आढावा, उपचार यांची व्यवस्था ठेवते. फोटो – वडगाव शेरी (पुणे) : येथील आपल्या कोठारी चॅरीटेबल ट्रस्टमधून दरररोजच्या सुमारे ८० रुग्णांच्या डायलेसीसच्या कामाचे नियंत्रण व नियमन करणारे प्रफुल्लशेठ कोठारी व त्यांचे चिरंजीव मितेश कोठारी.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!