Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्यावढू बुद्रुक शाळेला सी एस आर फंडाच्या माध्यमातून संगणक कक्ष व सहा...

वढू बुद्रुक शाळेला सी एस आर फंडाच्या माध्यमातून संगणक कक्ष व सहा संगणक प्रदान

एच एम क्लाउस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून १२ लाखांचा निधीतून संगणक कक्ष व सहा संगणक प्रदान केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार लाभ

कोरेगाव भीमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक ( ता.शिरूर)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री क्षेत्र वढू बुद्रुक शिवले मळा येथे एच एम क्लाउस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून सीएसआर फंडामार्फत आत्याधुनिक संगणक कक्ष इमारत उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक गावच्या सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे व माजी सरपंच व विद्यमान चेअरमन प्रफुल शिवले यांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडला.
कंपनीच्या माध्यमातून १ इमारत व सहा कॅम्पुटर असा १२ लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन तंत्रज्ञान व कम्प्युटर शिक्षणाची माहिती देऊन आधुनिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

यावेळी वढू बुद्रुक गावचे उपसरपंच राहुल कुंभार, माजी सरपंच अंकुश शिवले ,अनिल शिवले माजी उपसरपंच संतोष शिवले, संजय मस्कु शिवले ,शंकर शिवले, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे संचालक हनुमंत शिवले, आर अँड डी मॅनेजर इंडिया एम.आर.संतोषकुमार हेगडे , सी.एस.आर- व्यवस्थापक एशिया गोगई मौचुमी , आयटी विभाग महेश कोंडुकोरी , प्रक्रिया सुधारणा व्यवस्थापक सी एन अनिथा ,स्टेशन व्यवस्थापक पुणे तापकीर टी.आर ,ब्रीडर ईश्वर बूडी, विक्री प्रफुल थोरात , ग्रामपंचायत समस्या संगीता सावंत, वि.वि.का.सोसायटीचे विद्यमान संचालक संजय शिवले, आनंदराव शिवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव शिवले, माजी अध्यक्ष गणेश शिवले, उपाध्यक्ष रेखा शिवले व सर्व व्यवस्थापन समिती ग्रामस्थ तरुण मित्र वर्ग उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!