Wednesday, September 11, 2024
Homeस्थानिक वार्तावढू बुद्रुक येथे स्वामी समर्थांच्या मूळ चर्म पादुकांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदीयाळी

वढू बुद्रुक येथे स्वामी समर्थांच्या मूळ चर्म पादुकांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदीयाळी


स्वामींच्या मुळ चर्म पादुका या श्रावण महिन्यात दर्शनासाठी महाराष्ट्रभर

कोरेगाव भिमा – दि. ०४ ऑगस्ट
श्री स्वामी समर्थ , दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजरात स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांची श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) हजेरी लक्षणीय होती. यावेळी चर्म पादुकांवर अभिषेक केल्यानंतर पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.
अक्कलकोट येथिल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्यावेळच्या रोजच्या दैनंदिन जविनातील अनेक वस्तू स्वामी महाराजांचे शिष्य चोळप्पा यांच्या कुटुंबाकडे आजही आहेत. त्या वस्तूंमधील मुळ चर्म पादुका या श्रावण महिन्यात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जात असतात. गतवर्षी पासुन या मुळ चर्म पादुकांचे आगमन श्री छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेले श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) याठिकाणी नितीन भंडारे व माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे यांच्याकडे येत असतात. यावर्षीही या पादुका वढू बुद्रुक याठिकाणी आल्यानंतर स्वामी भक्तांनी मोठ्याप्रमाणात गर्दी करत स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
यावेळी सदगुरु मिलींददादा घाडगे यांच्यासह पंचायत समितीच्या उपसभापती सविता प-हाड , चोळप्पा महाराजांचे सहावे वंशज निलेश नितीन पुजारी , वढु खुर्दचे माजी सरपंच माऊली चोंधे , वढू बुद्रुकचे माजी सरपंच साहेबराव भंडारे , महादेव भंडारे , माजी चेअरमन शहाजी भंडारे ,मराठी पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी सुनील भांडवलकर, सणसवाडीचे संजय दरेकर , उमेश हरगुडे , ग्रामपंचायत सदस्य अनिल भंडारे , उत्तम भंडारे , सोमनाथ भंडारे , अशोक भंडारे , अवधुत परीवाराचे सोमनाथ तरडे , अजित खैरे , राजेश जगताप , अमर गव्हाणे , प्रविण सुक्रे , अमोल उंद्रे , आदेश घावटे व स्वामीभक्त व महिला मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

यावेळी सकाळी चर्म पादुकांवर मंत्रांच्या जयघोषात अभिषेक झाल्यानंतर पादुका दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या. यावेळी दर्शनासाठी स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. आलेल्या स्वामी भक्तांसाठी महाप्रसादही ठेवण्यात आला होता.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!