Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यावढू बुद्रुक येथे वीज पडून वृध्द दाम्पत्य जखमी, सुदैवाने चौदा वर्षांचा नातू...

वढू बुद्रुक येथे वीज पडून वृध्द दाम्पत्य जखमी, सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला

विजेच्या आवाजाने लक्ष्मीबाई यांच्या कानाला इजा झाली आहे या अपघातात त्यांच्या कानाचा पडदा फाटला असून वृद्ध दाम्पत्य रानात जागेवरच बेशुद्ध पडले सुदैवाने चौदा वर्षीय नातू पुढे पळत आल्याने मोठा अनर्थ टळला व कोणतीही जीवित हानी झाली नसून लक्ष्मीबाई व उत्तम भंडारे यांची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती पुतणे माऊली भंडारे यांनी दिली.

कोरेगांव भीमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील सोमवार दिनांक २९ मे जोरदार सुसाटयाचा वादळवारा सुटका होता.यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू होता. वढू बुद्रुक येथील अनाजीचा मळा येथील शेतकरी आजी आजोबा व नातू रानातून घरी येत असताना जोरदार पाऊस सुरू झाला यावेळी त्यांचा १४ वर्षीय नातू ओम हा पाऊस आला म्हणून पळत आला पण वृध्द आजी आजोबा मागे चालत येत होते रानाच्या मधोमध आल्यावर नेमकी त्याचवेळी वीज खाली कोसळली पण सुदैवाने वीज वर असणाऱ्या तारांवर वीज पडली (Lightning strikes)त्यामुळे मोठा अनर्थ टाळला (Elderly couple injured by lightning in Vadhu Budruk, fortunately fourteen-year-old grandsonsurvives) असून या अपघातात लक्ष्मीबाई उत्तम भंडारे या जखमी झाल्या त्यांना अचानक पडलेल्या विजेमुळे वृध्द दाम्पत्य घाबरले तसेच ते जागीच बेशुद्ध पडले.यावेळी विजेच्या आवाजाने लक्ष्मीबाई भंडारे यांच्या कानाचा पडद्याला इजा झाली असून तो फाटला आहे. नातेवाईकांनी लक्ष्मीबाई भंडारे यांना वाघोली येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

या अपघातात लक्ष्मीबाई यांना जास्त भाजले असून उत्तम भंडारे हे किरकोळ जखमी झाले आहेत तर दैव बलवत्तर म्हणून १४ वर्षीय नातू ओम याला पुढे पळत आल्याने तो सुखरूप असून लक्ष्मीबाई व उत्तम भंडारे या दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरीच उपचार सुरू असल्याचे पुतणे ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली भंडारे यांनी सांगितले.

आमदार अशोक पवार (MLA Adv Ashok Pawar) यांनी वीज पडून जखमी झालेल्या दाम्पत्याची घरी जाऊन आपुलकीने भेट घेत आरोग्याविषयी चौकशी करत काळजी करू नका , तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला यावेळी दिला.यावेळी आमदार अशोक पवार , माजी पुणे जिल्हा नियोजन समिती पंडित दरेकर व ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे, उद्योजक संतोष भंडारे उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी वादळ वारा आला व ढगांचा मोठ्या प्रमाणात गडगडाट झाला त्यावेळी उत्तम भंडारे यांच्या घरापुढील नारळाच्या झाडावर वीज पडली होती तर आता घरामागील शेतात अंदाजे साठ ते सत्तर फुटावर वीज पडली असून यावेळी लक्ष्मीबाई भंडारे या जखमी झाल्या तर पती उत्तम भंडारे व ओम भंडारे हे तिघेही सुदैवाने व बलवत्तर नशिबाने बचावले आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!