सुदैवाने जीवित हानी नाही कुटुंबातील बारा व्यक्ती सुखरूप तर चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे रविवारी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास जोराच्या वादळ वाऱ्यामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. यामध्ये शेतकऱ्याच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही पण चार चाकी गाडीचे मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झाले आहे.
घरावर कोसळलेले झाड पाहताना घरातील ज्येष्ठ महिलेच्या डोळ्यात पाणी आले असून हताशपणे घराकडे पाहत सुदैव म्हणून कुटुंबातील कोणालाही कसलीच इजा झाली नाही.
वढू बुद्रुक येथील शेतकरी हुसेन लतिफ शेख हे आपल्या आई वडील, दोन मुले , सुना, मुलगी, जावई व ६ नातवंडे असा परिवार घरात असताना अचानकपणे जोराच्या वादळ वाऱ्यामध्ये एक झाड कौलारू घरावर कोसळल्याने घराचे कौलारू क्षेत्र पूर्णपणे मोडून खाली पडले तर यामध्ये एस क्रॉस या गाडीचे नुकसान झाले MH १२ MW ९८९७ या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी नाही.
सबंधित घराचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात येणार असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तलाठी घोडे यांनी दिली.