Wednesday, September 11, 2024
Homeशिक्षणवढू बुद्रुकच्या सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या हस्ते शाळेच्या संगणक कक्ष...

वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या हस्ते शाळेच्या संगणक कक्ष खोलीचे पाया पूजन संपन्न

कोरेगाव भीमा- वढू बुद्रुक ( ता.शिरूर) “शाळेतील भौतिक सोयी-सुविधा, शैक्षणिक साहित्याचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक भारताचा सक्षम नागरिक बनवावा “असे वढू बुद्रुक सरपंच सारिका अंकुश शिवले यांनी शाळेला ग्रामपंचायत निधीतून दिल्या गेलेल्या भौतिक नूतन सुविधा विकासकामे उदघाटन प्रसंगी विचार व्यक्त केले.

तसेच आधुनिक युगात विद्यार्थ्यांना संगणक व तंत्रज्ञानाचे ज्ञान असण्याबरोबरच सर्वगुणसंपन्नता त्यांच्या अंगी यावी यासाठी शिक्षक ,पालक व ग्रामस्थ प्रयत्न करत असून यामध्ये वढू बुद्रुक ग्राम पंचायत महत्वाची कामगिरी करत आहे.विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ग्राम पंचायत नेहमी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सारिका अंकुश शिवले यांनी सांगितले.

कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी वढू बुद्रुक च्या सरपंच सारिका शिवले होत्या यावेळी एच. एम .क्लाउस इंडिया प्राव्हेटेड लिमिटेड यांनी शाळेला दिलेल्या अत्याधुनिक संगणक कक्ष खोली पायापूजन उदघाटन डियोन नेगी , जेम्स ब्रूस्का, गुरुप्रसाद गड्डेकरी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,शिवलेमळा (वढू बुद्रुक )येथे ग्रामपंचायत निधीतून झालेल्या शालेय नूतनीकरण उदघाटन व सी. एस. आर. फंड यांच्या संगणक कक्ष पायापूजनसमारंभ कार्यक्रमला उपसरपंच राहुल कुंभार , माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले ,ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे ,कृष्णा आरगडे , अंजली शिवले , माजी उपसरपंच संजय शिवले ,संचालक जालिंदर शिवले, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना संचालक हनुमंत शिवले, माजी उपसरपंच शंकर वामन शिवले, संचालक आनंद शिवले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव शिवले, उपाध्यक्ष रेखा शिवले, सुरेश दरगुडे, सचिन शिवले,शालेय व्यस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक रविंद्र शिवरकर व राजाराम सकट , बाबा शिवले, अर्चना भंडारे,बंडू तापकीर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!