प्रतिनिधी मिलिंदा पवार सातारा
वडूज – दिनांक १५ मार्च
वडूज (ता. खटाव) येथे हरणाई सूत गिरणी लि येळीव च्या वतीने आयोजित केलेल्या हरणाई कृषी प्रदर्शन २०२२ ला मंत्री कदम यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे चिटणीस रणजितसिंह देशमुख , जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, नगराध्यक्षा मनीषा काळे, माजी सभापती संदीप मांडवे, भाजपा तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, अशोकराव गोडसे, संजीव साळुंखे, डॉ. विवेक देशमुख, डॉ. महेश गुरव, नगर सेवक अभय देशमुख, बाबासाहेब माने, संदीप सजगणे,राजेंद्र लोखंडे, उज्वला जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री कदम यांनी राज्यशासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच कोरोनामुळे खचलेल्या शेतकर्यांना कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला. पूर्वी खटाव-माण प्रमाणेच कडेगांव, पलूस हे तालुके कायमस्वरुपी दुष्काळी होते. स्व. पतंगराव कदम साहेब यांनी प्रयत्नपूर्वक या भागासाठी टेंभू, ताकारी व इतर योजनांचे पाणी या भागात आणल्यामुळे मोठी कृषी क्रांती झाली आहे. अलिकडच्या काळात खटाव-माण भागातही उरमोडीचे पाणी येत आहे. नजीकच्या काळात जिहे-कठापूर योजनेचेही काम मार्गी लागणार आहे. यापुढच्या काळात शेतकर्यांनी ऊसा व्यतिरीक्त इतर पिकेही घ्यावीत. शेतकर्यांना कृषी विभागामार्फत अद्यावत तंत्रज्ञान पुरविले जाईल. रणजित देशमुख यांनी भाषणात मंत्री कदम यांनी खटाव-माण चे पालकत्व घेण्याची मागणी करण्याबरोबर चालू गळीत हंगामात ऊसाबाबत सोनहिर्याने अतिरिक्त दायित्व घेण्याची मागणी केली. यावेळी डॉ. जाधव, कृषी अधिकारी आर. एन. जीतकर, डॉ. गुरव यांचीही भाषणे झाली. प्रसाद जगदाळे, राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. सभेपूर्वी मंत्री कदम यांनी मान्यवरांसमवेत कृषी विभाग व अन्य स्टॉलला भेट देवून समक्ष पाहणी केली.
हरणाई सहकारी सूतगिरणी लिमिटेड तालुका खटाव आयोजित हरणाई कृषी प्रदर्शन २०२२ चा समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे शेतकऱ्यांचे कैवारी माजी खासदार राजू शेट्टी स कृषी प्रदर्शनाचे आयोजक व राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रणजीत सिंह देशमुख ,शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार युवा नेतृत्व सूर्यभान जाधव, सूर्यकांत भुजबळ,ॲड देवकर, दत्तू काका ,घागे,तानाजीराव देशमुख डॉ.महेश महेश गुरव,अभय देशमुख,डॉक्टर संतोष गोडसे,रणधीर सेठ जाधव ,निलेश गोडसे, बाबा गोसावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.