Friday, June 21, 2024
Homeइतरवंचित गावासाठी पाणी मिळणे बाबत या विचारविनिमय बैठकीचे आयोजन - माजी...

वंचित गावासाठी पाणी मिळणे बाबत या विचारविनिमय बैठकीचे आयोजन – माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर

मिलिंदा पवार (वडूज) सातारा

दिनांक २३ एप्रिल सातारा – माण – खटाव तालुक्यासाठी पिण्याचे पाणी व सिंचन व्यवस्थेसाठी असलेल्या जिहे-कठापूर उरमोडी, टेंभू तारळी, ब्रह्मपुरी आदि उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून खटाव माण मधील वंचित राहिलेल्या भागासाठी पिण्याचे पाणी व शेतीला पाणी मिळण्यास सामुदायिक प्रयत्न करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रविवार दिनांक २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे .

उरमोडी सिंचन योजनेद्वारे आठ महिने पाणी मिळावे योजनेतून आंधळी धरणातून उत्तर भागातील३२ गावांसाठी व नेर मधून दरजाई, दरुज सातेवाडी, पेडगाव ,एनकूळ, कणसेवाडी या १५ गावासाठी पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळवणे टेंभू योजनेतून मायणी, कलेढोण, कान्हरवाडी, हिवरवाडी , पडळ आदी१६ गावांसाठी तसेच गारुडी, तरसवाडी, माण तालुक्यातील विरळी शेनवडी, वरकुटे मलवडी, कुकुडवाड, वडजल या १८ गावांना पाणी मिळणे, ब्रह्मपुरी उपसा सिंचन योजनेतून गोपुज ,औंध, पळशी, अंभेरी, कोकराळे , आदी वंचित गावासाठी पाणी मिळणे बाबत या बैठक विचारविनिमय केला जाणार आहे त्यानंतर त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे बैठकीस सर्व पक्ष यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!