नागरिकांना शासकीय योजना व लाभ मिळवून देण्यास त्यांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी सदैव प्रयत्न करणार – उपसरपंच राहुल शिंदे
कोरेगाव भीमा – लोणीकंद (ता. हवेली) येथे शासन आपल्या दारी मोहिम अंतर्गत आभा कार्ड, बीपी शुगर कॅम्प,तसेच आरोग्याचे विविध कार्यक्रम राबवण्यात आल्याने नागरिकांना याचा मोठा फायदा झाला असून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत लोणीकंद शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत आभा कार्ड, बीपी शुगर कॅम्प,तसेच आरोग्याचे विविध कार्यक्रम राबवण्यात आले.
डॉ फड मॅडम, समुदाय आरोग्य अधिकारी- शैला फड, आरोग्य सेविका ज्योती झटाले, छाया हरगुडे ,रेखा साकोरे,
सुनंदा शिंदे,मंगल खेडकर, सविता साळवे, मनिषा मगर, कमल साबळे यांनी वैद्यकीय सेवा केली.
यावेळी हवेली कृषी उत्पन्नन बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद, लोणीकंद ग्रामपंचायतिच्या सरपंच प्रियांका झुरुगे, उपसरपंच राहुल शिंदे, माजी उपसरपंच नंदकुमार कंद, माजी उपसरपंच ओंकार कंद, ग्रामपंचायत सदस्य डॉ सोनाली जगताप, डॉ सागर कंद, सुधीर कंद, सुप्रिया कंद, डॉ गणेश जगताप लोणी कंद उपकेंद्र यावेळी उपस्थित होते.