Sunday, June 16, 2024
Homeइतरलोणीकंद येथे मगरवस्ती जवळ गॅस टँकर पलटी होऊन गॅस गळती पण प्रशासनाच्या...

लोणीकंद येथे मगरवस्ती जवळ गॅस टँकर पलटी होऊन गॅस गळती पण प्रशासनाच्या सतर्कतेने टळला पुढील मोठा अनर्थ

पोलीस प्रशासन , अग्निशमन दल, एम एस सी बी , गॅस सेफ्टी टीम यांच्या एकत्रित समनव्याने व गतिशील कामाने टळला मोठा अनर्थ

कोरेगाव भीमा – लोणीकंद (ता.हवेली) येथील मगर वस्ती वळणाला रात्री दोनच्या सुमारास भारत गॅस कंपनीचा गॅसने भरलेला गॅस टँकर (एम. एच. ०४ एफ यु १६६६)पलटी झाला. त्यातून गॅस गळती होत होती.याबाबत पोलीस प्रशासनाने अपघाताची माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटांत मदत करत सर्व विभागांना सूचना देत मदतीसाठी पाचारण करत सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळत खूप मोठा अनर्थ टाळल्याने अग्निशमन दल, एम एस सी बी , गॅस सेफ्टी टीम व विशेषतः लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन विश्वजीत काइंगडे व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

या अपघाता बाबतची माहिती लोणीकंद पोलीस स्टेशनला कळल्यावर अवघ्या दहा मिनिमिनिटांत पोलीस मदत पोचली संबधित कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देताच तातडीने नाकाबंदी करत,समाज माध्यमांचा वापर करत सदर अपघाता बाबत परिसरातील नागरिकांना सतर्कतच्या सूचना देत तातडीनेजवळील नागरिकांचे स्थलांतर करणेसाठी आवाहन करण्यात आले. एम एस सी बी विभागायाबाबत माहिती देत मगर वस्ती परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला तर वाघोली येथील अग्निशमन दलाला व गॅस सेफ्टी टीम यांना तातडीने पाचारण करण्यात आले.

पोलीस प्रशासनाने कार्यतत्परता – पोलीस विभागाकडून अचूक नाकाबंदी व पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करत टाळली वाहतूक कोंडी तलन आली लोणीकंद येथील मगर वस्तीवर भारत गासरपळती होऊन गॅस गळती सुरू असल्याच्या गंभीर घटनेमुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या.तातडीने नाकाबंदी करत वाहतूक वळवण्यासाठी दहा चेक पॉईंट्स / पंक्चर पॉईंट्स वर अंमलदार नेमले होते. यामध्ये सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा येथे नाकाबंदी, केसनंद, लोणीकंद येथील थेऊर फाटा येथे नाकाबंदी,बाकोरी फाटा बिजेएस कॉलेज येथे नाकाबंदी, बाजरी गावच्या रस्त्याला नाकाबंदी करत बॅरीगेट व दोरी लावत पर्यायी मार्गाची वाहतूक सुरू करण्यात येईल वाहतूक कोंडी होऊ दिली नाही.

समाज माध्यमांचा प्रभावी वापर – भारत गॅस टँकर पलटी होऊन गॅस गळती सुरू असल्याने व पुढील अनर्थ टाळण्यासाठी व जीविताची काळजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रशासन व सुज्ञ नागरीकांनी आवाहन करताच नागरिकांनी व प्रशासनाच्या इतर विभागांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. यामुळे प्रशासनाला योग्य काळजी घेत तातडीने काम करता येऊन पुढील अनर्थ तलाता आला.

गॅस रेस्क्यु टीमचे अचूक कामाने नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास – भारत गॅस टँकर मधून गॅस गळती होत होती यासाठी गॅस रेक्यू टीमने अचूक नियोजन केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने वीज प्रवाह खंडित करण्यात आला.यावेळी अग्निशमन दलाकडून गॅस टँकर वर पाण्याचा फवारा मारत क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेल्या टँकरला सरळ करण्यात आले तसेच फिलिंग मशीन गाडीच्या साहाय्याने गॅस दुसऱ्या मोकळ्या टँकरमध्ये गॅस भरणायात आला. यावेळी प्रशासन तळहातावर प्राण घेऊन काम करत होते.रेसक्यू टीम जे सांगेल ते तातडीने करण्यात येत होते.यावेळी पोलीस प्रशासन , अग्निशमन दल, एम एस सी बी , गॅस सेफ्टी यांच्या एकत्रित समनव्याचे अनोखे दर्शन झाले.

एम एस सी बी विभागाचे महत्वपूर्ण काम – घटनास्थळावरून उच्च दाबाच्या (High Tension) विद्युतवाहक तारा जात असल्याने तातडीने विद्युत प्रवाह बंद केला आहे. यामुळे लोणीकंद , मगरवस्ती, आय व्ही स्टेट , बकोरी परिसरातील तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी महावितरणचे वाघोली शाखा दीपक बाबर, वरिष्ठ तंत्रज्ञ पुरुषोत्तम बेलदार , गणेश लोखंडे, बाह्यस्त्रोत कर्मचारी जयवंत वारघडे, मंगेश बडे, गजानन जाधव यावेळी मदतीसाठी काम केले.

अग्निशमन दलाचे महत्वपूर्ण योगदान – पलटी झालेला टँकर मधील गॅस गळती होत असताना त्यातून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यासाठी सरळ करणे गरजेचे होते यावेळी अत्यंत रिस्क घेत क्रेनच्या सहाय्याने टँकर सरळ करताना अग्निमशमन दलाने पाण्याचा फवारा मारत योग्य ती काळजी घेत मोठा अनर्थ टळला.यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वाघोली अग्निशमन केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक- संदीप शेळके, नितीन माने, फायरमन- प्रशांत अडसूळ, प्रकाश मदने, सचिन गवळी, सुरज इंगवले, संदीप तांबे उपस्थित होते

पोलीस दलाचे आभार – अपघात झालंय हे कळताच अवघ्या दहा मिनिटांमध्ये मदत पोचवत योग्य ती खबरदारी घेत समाज माध्यमावर आवाहन केत नागरिकांच्या जीविताची काळजी घेत संबधित सर्व विभागांना पाचहरात करत अक्षरशः पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्र जागून तर काढलीच पण शनिवारी दिवसभर काम केले.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन विश्वजीत काइंगडे , सहाय्यक पोलीस निखिल निरीक्षक पवार साहेब ,पोलीस उपनिरीक्षक झुरंगे ,पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार दळवी ,पोलीस नाईक रितेश काळे ,ए एस आय बाळासाहेब सकाटे,पोलीस हवालदार बेंद्रे, कुणाल सरडे अमोल भोसले तुषार पवार ,मोराळे, सारंग दळे, निर्णय लांडे, महेंद्र शिंदे पोलीस शिपाई शिवाजी सालके, प्रमोद शिंदे, अजित कारकूड, दत्ता गावडे व इतर पोलीस करमाचाऱ्यांनी महत्वपूर्ण काम केले.नागरिकांनी सर्व विभागांचे आभार मानत अभिनंदन केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!