कोरेगाव भीमा – लोणीकंद ( ता.हवेली) पोलिसांनी
(Lonikand Police) हद्दीतील ग्रामीण भाग असणार्या पिंपरी सांडस (Pimpri Sandas) येथील गावठी दारू तयार करणार्या हातभट्टीवर छापा टाकून दारू आणि गावठी दारू बनविणार्यासाठी लागणारी रसायने मोठया प्रमाणावर जप्त केली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Pune Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारूचे अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषांगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Sr PI Vishvajeet Kaingade) यांनी पोलिसांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांची दोन पथके कारवाईसाठी रवाना झाली. (Pune Crime News)
पोलिसांच्या पथकाने हातभट्टीपासून सुमारे एक किलोमीटर वाहने लांब पार्क केली. तेथून पोलिस चालत हातभट्टीच्या ठिकाणी गेले. पिंपरी सांडस येथील गट नंबर ८३४ मधील एका पडीक जागेवर हातभट्टीच्या धंद्यावर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी ७० लिटर दारू जप्त केली तर तब्बल २५०० लिटर रसायन, दारू गाळण्याचे लोखंडी बॅरल, अॅल्युमिनिअमचा पाईप आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हातभट्टीसाठी लागणार्या मालाचा पुरवठा करणारा फरार झाला आहे. गुन्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी यापुर्वी दि. १ जुलै २०२३ रोजी मौजे भावडी गावच्या हद्दीमध्ये देखील अशाच प्रकारची कारवाई करून तिघांना अटक करण्यात आली होती.
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील (PI Maruti Patil), पोलिस निरीक्षक (गुन्हे) सिमा ढाकणे (PI Seema Dhakane), सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव (API Gajanan Jadhav), पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलिस नाईक सागर जगताप, कैलास साळुंके, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, पोलिस अंमलदार अमोल ढोणे, साई रोकडे, सचिन चव्हाण, प्रशांत धुमाळ, महिला पोलिस अंमलदार वृंदावणी चव्हाण, कोमल भोसले आणि निलम कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.