कोरेगाव भीमा – लोणीकंद ( ता.हवेली) मागील काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीसक्षेत असलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा पावसाने दिला असून लोणीकंद ( ता.हवेली) येथे जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजा आनंदित झाला आहे पण एव्हढा पाऊस पुरेसा नसून जोरदार पाऊस होणे गरजेचे आहे.
लोणीकंद परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले तर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.जोरदार पाऊस सुरू झाल्याने दुचाकी स्वारांना वाहन चालवणे कठीण झाले होते त्यात पाऊस काही वेळ जोरदार तर काहीवेळ हलक्या पावसाच्या सरी बरसत असल्याने वाहन चकलकंनाची काही वेळ संभ्रमावस्था पाहायला मिळाली.