Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यालोकसहभागातून वढू बुद्रुक येथील ग्रामस्थांनी वनराई बंधारे मोठ्या प्रमाणात उभारावे - तहसीलदार...

लोकसहभागातून वढू बुद्रुक येथील ग्रामस्थांनी वनराई बंधारे मोठ्या प्रमाणात उभारावे – तहसीलदार बाळासाहेब म्हस्के

जलयुक्त शिवार करण्यासाठी ग्रामस्थांनी सहभाग वाढवण्याचे आवाहन

कोरेगाव भीमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ताल.शिरूर) येथील ग्रामस्थांनी परिसर जलयुक्त करण्यासाठी व  श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसरात वृक्षारोपण व शेतियुक्त भागात जलयुक्त परिसर वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे उभारावे असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले.

        जलसुरक्षा विषयांतर्गत जल व्यवस्थापन, पाणी अडवा पाणी जिरवा ,वनराई बंधारा उपक्रमांतर्गत श्री धर्मवीर छञपती संभाजी महाराज शिक्षण संस्थेच्या शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करत व वढू बुद्रुक ग्राम पंचायतीच्या वतीने के. टी. बंधारा उभारण्याचे श्रमदान सुरू असताना शिरूरचे तहसीलदार बळसाहेब म्हस्के , शिरूर तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी भेट देत पाहणी करत कामाचे कौतुक केले. तसेच तहसीलदार म्हस्के यांनी वनराई बंधाऱ्यासाठी गोण्यामध्ये माति भरत श्रमदान केले तसेच के. टी बंधारे कसे उभारावेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपस्थितांशी मुक्त संवाद साधत जलयुक्त शिवराचे महत्व पटवून दिले.

     यावेळी माजी सरपंच अंकुश शिवले,माजी उपसरपंच लाला तांबे, ग्राम पंचायत सदस्य माऊली भंडारे,कृषी अधिकारी प्रशांत दोरगे, ग्राम विकास अधिकारी शंकर भाकरे, मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण सर, पोपट वणवे सर, विकास कुरकुटे सर,क्लार्क संतोष शिवले,निखिल शिवले, अंबर भंडारे उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!