Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यालोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दुःखद निधन

लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दुःखद निधन

शिरूर – हवेलीच्या जनतेसह जिल्ह्यातील जनतेकडून श्रद्धांजली अर्पण

लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनाने जिल्ह्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हक्काचा आधारवड हरपला

कोरेगाव भीमा – शिरुर ( ता.शिरूर) लोकनेते बाबुराव काशिनाथ पाचर्णे (वय ७१) आज गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी बारा मिनिटांनी निधन दुपारी १२ वाजून पंधरा मिनिटांनी निधन झाले आहे.माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनाने शिरूर तालुक्यात राज्यभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे . त्यांच्या निधनाने शिरूरच्या जनतेने हक्काचे नेतृत्व हरवले असून जनसामान्यांचा आधारवड हरपला आहे.

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी शिरूर हवेलीचे आमदारपद दोन वेळेस भूषविले असून या भागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी विधानसभेत केले होते . सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकी दरम्यानच त्यांच्या प्रकृती बाबत काळजाई वाटत होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते .

 माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना  सुमारे दीड वर्षांपूर्वी कर्करोगाची लागण झाली होती . शिरूर येथील एका खाजगी रुगणालयात उपचार चालू होते . यादरम्यान , त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले . या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेल्याने आज त्यांचे दुःखद निधन झाले.
 माजी आमदार  बाबुराव पाचर्णे यांच्या पश्चात पत्नी , माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले पूत्र राहुल पाचर्णे , एक मुलगी , जावई कर्नल महेश शेळके , नातवंडे , चार भाऊ , पाच बहिणी असा परिवार आहे . त्यांचा शिरूर आणि हवेली तालुक्यात जनसंपर्क व मित्रपरिवार असल्याने त्यांच्या जाण्याने दोन्ही तालुक्यावर शोककळा पसरली आहे .

अंत्यदर्शन व अंत्यविधी – दुपारी एक ते तीन वाजे पर्यत पार्थिव दर्शन पाचर्णे रेस्टहाउस बाबूराव नगर येथे असेल दुपारी तीन वाजता बी जे कॉर्नर पुणे नगर शिरुर येथे आणण्यात येणार आहे. अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता शिवतारा कृषि पर्यटन तर्डोबाचीवाडी शिरुर येथे होणार आहे.

लोकनेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनाने जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण – माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यातील एक निष्ठावान नेता,सहकारी व खंबीर साथीदार हरवला असून यामुळे पुणे जिल्ह्यातील भाजपा मध्ये मोठी पोकळी जाणवणार आहे.

जनसामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड हरवला - सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हक्काचा व जीवाचा जिवलग नेता हरपला असून जनसामान्य कार्यकर्त्यांचा आपला आधारवड हरपला असल्याची भावना भाजपा कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

शिरूर तालुक्याच्या राजकारणातील सर्वसामान्यांचा बुलंद आणि कणखर आवाज, धुरंधर ,दिलदार,जिगरबाज, माणुसकी जपणारे कर्तृत्ववान नेतृत्व, अभ्यासू आणि तळागाळातील जनतेच्या अडीअडचणींना सोडवणारे सर्वंकश नेतृत्व हरपले असून यामुळे शिरूर तालुक्यातील सामान्य जनतेच्या मनातील लोकनेते असे अढळ श्रद्धास्थान असलेले माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनाने शिरूर तालुक्यातून दुःखद शोक व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!