Thursday, July 25, 2024
Homeक्राइमलेण्याद्री गणपती मंदिर, कान्हुर मेसाई मंदिरांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लेण्याद्री गणपती मंदिर, कान्हुर मेसाई मंदिरांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाच किलो चांदीची गणपती मूर्तीसह सहा किलो सातशे ग्रॅम चांदीच्या दागिने अशा तब्बल पावणे बारा किलो चांदीच्या मुद्देमालासह सराफलाही केले अटक

मंदिरे लुटणारी तब्बल ३२ गुन्हे दाखल असलेली आंतरजिल्हा टोळी गजाआड. लेण्याद्रीतील अष्टविनायक गणपती,कान्हूर मेसाई येथील मेसाई मंदिर, जुन्नर शहरातील गणेश मंदिर व मंचर मधील तुकाई मंदिरात केली होती चोरी.

दिनांक १७ ऑगस्ट.पुणे – अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीच्या गणपतीचे , कान्हुरच्या मेसाई मंदिरासह दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या ठोकल्या असून आंतरजिल्हा टोळीने मंदिरांना लक्ष्य करून देवी देवतांचे दागिने लुटणाऱ्या व तब्बल ३२ गुन्हे दाखल असलेल्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला पुणे जिल्हा स्थानिक शाखेने गजाआड करण्यात यश मिळविले आहे. या टोळीकडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे मंदिरातील देवांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

याप्रकरणी या टोळीचा म्होरक्या भास्कर खेमा पथवे वय (४६ वर्ष )राहणार नांदूर दुमाला तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यास घोडेगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार सोमनाथ शिवाजी भुतांबरे (वय २४ वर्षे ) रा . समशेरपुर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर व दागिणे विकत घेणारा रघुनाथ कपिले (वय ६२ वर्ष) राहणार संगमनेर तालुका संगमनेर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून देवाचे चांदीचे दागिने सुमारे चार लाख ६७ हजार रुपये किंमतीचे हस्तगत करण्यात आले आहे. यामध्ये पाच किलोग्रॅम वजनाच्या चांदीच्या गणपतीच्या मूर्तीचा समावेश आहे. जुन्नर आंबेगाव शिरूर विभागामध्ये विविध मंदिरांमध्ये सातत्याने चोरीचे गुन्हे घडत होते. यामुळे नागरिक व भाविक भक्तांमध्ये रोष वाढत चालला होता. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळावरील मंदिरातून सिसीटीव्ही चे फुटेज तपासून बातमीदारांमार्फत आरोपींची ओळख ओळख पटवली. आरोपी हे सराईत चोरटे असून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीना अखेर अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.

पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकापैकी एक असलेल्या जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपती मंदिरात लाखो भाविक येत असतात या मंदिरातील चोरी या आरोपींनी केली होती.तसेच शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे मेसाई देवीचे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी वर्षभर भाविक येत असतात तसेच नवरात्रात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जुन्नर शहरातील गणेश मंदिर तसेच मंचर येथील जाधववाडी जवळ असलेल्या तूकाई मंदिरातून देखील या चोरट्यांनी चोरीचे गुन्हे केले आहेत. मंदिरातील दागिने सुरक्षित रहावे यासाठी मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील वस्तीवरील मंदिरांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आव्हान देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र कुमार चौधर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस शिपाई अभिजीत सावंत, हवालदार दीपक साबळे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, अतुल ढेरे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस शिपाई दिलीप पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील शिंदे, विलास लेंबे यांनी आरोपी अटक करण्यात मोठी भूमिका बजावली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!