Saturday, July 27, 2024
Homeक्राइमलुटेरी दुल्हन ! लग्नाच्या मध्यरात्रीच सोन्याच्या दागिन्यांसह नवरी दबक्या पावलांनी फरार..

लुटेरी दुल्हन ! लग्नाच्या मध्यरात्रीच सोन्याच्या दागिन्यांसह नवरी दबक्या पावलांनी फरार..

नव्या नवरीने मध्यरात्री लगीन घराला लावली बाहेरून लावली कडी … कलवरीसह नवरीला पळून जायला चार चाकी गाडी

लग्नासाठी मध्यस्थी करणार्‍या एजंटला दोन लाख रुपये नवरदेवाकडील नातेवाइकांनी रोख दिले असल्याची चर्चा सुरू

शिरूर – शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी गावामध्ये लग्नानंतर मध्यरात्री नवरी दागीने घेऊन पळाल्याची घटना घडली आहे. लग्न जमविण्यासाठी नवरीकडील ‘एजंटा’ने घेतलेले दोन लाख रुपये, नवरी अंगावरील दागिने घेऊन पसार झाल्याने एकच खळबळ उडाली असून लग्नाच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळीचे वान ग्रामीण भागात पोचते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या उपवर मुलाला लग्नासाठी मुलगी शोधने हे महाकठीण झाले आहे. त्यात काही मध्यस्थांमार्फत लग्न जमावण्याकडे कल असल्याचे दिसत असून नुकताच शिरूर तालुक्यात एक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. परंतु नवरी सासरी आल्यानंतर लग्नाच्या मध्यरात्रीच नवरीने लाखो रुपयांचे दागने घेऊन धूम ठोकली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चर्चांना उधाण आले आहे.

शिरूर तालुक्यातील तांदळी येथे हि घटना घडली आहे. तांदळी येथील एका कुटुंबाने मध्यस्थाच्या मदतीने मुलाचे लग्न जमवले होते. यासाठी त्या मध्यस्थ व्यक्तीने वरपित्याकडून दोन लाख रुपये रोख घेतले होते. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रमही नगर येथील एका हॉटेलमध्ये पार पडला होता. लग्नामध्ये नवरीला हौसेने दागिने घातले साखरपुडा, हळद, जेवण असा लग्न समारंभाचा कार्यक्रम उत्साहात व्यवस्थित पार पडला. लग्न झाल्यानंतर वधुकडील वऱ्हाडी निघून गेले होते. वधूसोबत रिवाजानुसार एक कलवरी थांबलेली होती. या दोघींनीही लग्नाच्या मध्यरात्री घराला बाहेरून कडी लावत अंगावरील व घरातील दागिन्यांसह चारचाकी गाडीतून धूम ठोकली. एका ग्रामस्थाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यालादेखील धक्का देऊन या दोघी चारचाकी गाडीमध्ये बसून पसार झाल्याचे समजल्यावर लग्नघरी एकच गोंधळ उडाला. नवरीबाई व तिच्याबरोबर असणारी कलवरी पळून गेल्याचे नवरदेवाच्या नातेवाइकांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर मुलाकडील नातेवाइकांनी मध्यस्थी करणार्‍याशी मोबाईलवरून संपर्क साधला; परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संबंधित नातेवाइकांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शिरूर तालुक्यातील सादलगाव येथेही काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना घडली होती.

सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव म्हणाले की, लग्न जमवणा-या एजंटचे सध्या सगळीकडेच प्रमाण वाढले आहे. मुलांची लग्ने जमत नसल्याने काही नागरिक पैसे देऊन एजंटला लग्न जमवण्यास सांगतात त्यामुळे फसवणुकीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पूर्ण खात्री पटल्याशिवाय लग्न जमवणार्‍या एजंटला पैसे देऊ नये. सध्या अनेक ठिकाणी मुलांचे लग्न जमत नसल्याने मुलांचे नातेवाईक मुलीच्या बाजूकडील मध्यस्थी करणार्‍या ‘एजंट’ला पैसे देऊन लग्न जमवतात, त्यामुळे काही ठिकाणी याचाच फायदा लग्न जमवणारे एजंट वर्ग घेतात आणि पसार होतात. लग्न झाल्यानंतर मुलगी ही लगेच पळून जाते असे प्रकार या भागामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!