तहसीलदार सचिन जैस्वाल,चालक मंगेश कुलथे, शिपाई पंजाबराव ताठे यांना ५ हजारांची लाच स्वीकारताना घेतले ताब्यात
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपयाची लाच घेतांना अँटी करप्शन रंगेहाथ पकडले असून तहसीलदार सचिन जैस्वाल,चालक मंगेश कुलथे, शिपाई पंजाबराव ताठे यांना ताब्यात घेतले आहे.तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या शासकीय निवासस्थानांमधून ३७ लाख ५२ हजार १८० रुपये मिळुन आली तर परभणी येथील अँटी करप्शन,यांनी परभणी निवासस्थानांची घरझडती घेतली असता ९ लाख ४० हजार रक्कम मिळुन आली आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या सिंदखेडराजा येथील तहसिलदार सचिन शंकरलाल जैस्वाल यांचा बंगला व निवासस्थानी तब्बल अशी एकूण ४६ लाख ९२ हजार १८० रुपयांची मिळुन आली आहे.
तहसीलदार जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना ५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. यानंतर लाचलुचपत विभागाने वेगाने कारवाईची सूत्रे हलविली. बुलढाणा येथील कर्मचाऱ्यांच्या पथकाने जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा येथील शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. तिथे नोटांचे ढीगच हाती लागले. त्याठिकाणी तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम आढळून आली. त्यांच्या परभणी येथील घराची परभणी एसीबीने झडती घेतली असता तिथे ९ लाख ४० हजाराची रक्कम आढळून आली. पुढील तपासात आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी बोलून दाखविली.
यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून अवैधरित्या वाळू वाहतुक करण्यासाठी त्यांना ३५ हजाराची लाच मागण्यात आली होती. त्यानुसार ता.१२ एप्रिल रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता,चालक मंगेश कुलथे, यांनी तक्रारदार यांचेकडे तहसीलदार सचिन जैस्वाल यांचे करिता ३५ हजार रुपयांची लाच मागणी करुन सदर लाच देण्यासाठी यातील आरोपी शिपाई पंजाबराव ताठे यांनी प्रोत्साहन देवुन तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल यांनी सदर लाच रक्कम स्वीकारण्यास संमती देवुन सदर लाच रक्कम चालक मंगेश कुलथे यांचेकडे देण्यास सांगीतले होते.मंगेश कुलथे यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेवुन बोलावल्याने त्यांनी ३५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शितल घोगरे पोलीस उपअधिक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा,गजानन शेळके पोलीस उपअधिक्षक अँटी करप्शन ब्युरो वाशिम, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भोसले, एएसआयशाम भांगे, प्रविण बैरागी,विनोद लोखंडे, जगदीश पवार,पोकॉ रंजित व्यवहारे,स्वाती वाणी,नितीन शेटे, मधुकर रगड आदी करत आहे.