Sunday, June 16, 2024
Homeक्राइमलग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचा गंठण चोरट्याने हिस्कावला

लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचा गंठण चोरट्याने हिस्कावला

कोरेगाव भीमा – दिनांक १६ डिसेंबर पेरणे फाटा (ता.शिरूर) येथील गोल्डन पॅलेस कार्यालयात लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याचा गंठण चोरट्याने हिसकावून पळ काढला असल्याची धक्कादायक घटना घडली असून ग्रामीण भागात चोरट्यांचा बंदोबस्त केंव्हा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशन येथे संबधित महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार मिळालेली माहिती अशी की , दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७.१५ वा. सुमारास पेरणे फाटा ( ता.हवेली) येथील गोल्डन मंगल कार्यालयात लग्नकार्यासाठी संबधित महिला पती ,दिर ,जाऊबाई व छोट्या मुलीसह आले होते त्यावेळी चारचाकी गाडी पार्कींग करुन चालत कार्यालयाकडे जात असताना एक अनोळखी इसम याने फिर्यादी महिलेच्या गळयातून सोन्याचे मोठे गंठण जबरदस्तीने हिसकावून (चोरुन) पळ काढला यावेळी संबधित महिलेच्या कडेवर लहान मुलगी होती त्यावेळी फिर्यादी महिलेने आरड – ओरड केली पण काही समजण्या अगोदर चोराणे पळ काढला होता.

संबधित घटनेचा लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर जाधव ,सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव ,पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी पुढील तपास करत आहे.

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील पेरणे फाटा येथे महिलेच्या सोन्याच्या पाच तोळे गंठनची चोरी झाल्याने लग्न कार्ये व इतर शुभ प्रसंगी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून लग्न कार्यात आता सोने घालने कठीण झाले आहे . महिला भगिनींनी याबाबत सावधानता बाळगायला हवी. याबाबत लोणीकंद पोलिसांच्या समोर चोरीचा तपास करण्याचे आव्हान असून गुन्ह्याची उकल लवकरात लवकर उघड झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वाढण्यासाठी मदत होणार असून गुन्हेगारांवर वचक बसवणारा आहे .यासाठी पोलीस यंत्रणा आता किती दिवसात संबधित चोरासह मुद्देमाल हस्तगत करतात हे आगामी काळात दिसून येईल.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!