Saturday, July 27, 2024
Homeइतररोहित व रक्षीता यांचे शिंगणापूर येथे विध्यार्थी बालमित्रांसोबत वृक्षारोपण

रोहित व रक्षीता यांचे शिंगणापूर येथे विध्यार्थी बालमित्रांसोबत वृक्षारोपण

मिलिंदा पवार वडूज सातारा

वडुज – दिनांक १६ मार्च

शिखर शिंगणापूर (गुप्तलिंग ,ता.माण जिल्हा सातारा )येथील गुप्तलिंग परिसराच्या घाटमाथ्यावर व श्री ज्ञानमंदीर शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत पर्यावरण निसर्गप्रेमी रोहित बनसोडे व रक्षीता बनसोडे या भावंडांनी शालेय विद्यार्थी बालमित्र यांच्या सोबतीने वसंत ऋतु बहारचे औचित्य साधून वड पिंपळ या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या ठिकाणी देशी स्थानीय प्रजातीची आयुर्वेदिक वनऔषधी गुणधर्म वनस्पती चे वृक्षारोपण केले. माणदेशी दुष्काळी भागातील बहुतांश ठिकाणच्या बारमाही फळंफुलें देणाऱ्या झाडांचे अस्तित्व धोक्यात आलेले निदर्शनास येत आहे . म्हणून माणदेशी भागातील सर्व वन्यपशुपक्षांना बारमाही फळंफुलें देणाऱ्या रक्षीतावन संकल्पना राबवून या ठिकाणी झाडांचे वृक्षारोपण केले .

वारंवार या भागात पाऊसमान कमी होत चाललेले आहे. झाडांची संख्या कमी होत आहे याचा फटका सर्वाना बसत आहे परिणामी दुष्काळी परिस्थिती चा सामना करावा लागत आहे म्हणून निसर्ग झाडें जगली तरच आपण जिवंत राहणार आहोत ,, जास्तीत जास्त आक्सीजन देणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यासाठी रोहित रक्षीता या भावंडांच्या पाठिशी आम्ही लागेल ती मदत देऊन उभे राहणार आहोत याची सुरुवात म्हणून आम्ही सामाजिक जाणिवेतून ९ फुट उंचीच्या रोपांची त्यांना भेट दिली आहे – जयसिंग चव्हाण पुणे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!