सी एस आर फंडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी मदत
कोरेगाव भीमा – दिनांक २ फेब्रुवारी कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरेश्वर वस्ती येथील शाळेला रोटरी क्लब ऑफ पुणे व केमिस्टाँल इंडिया कंपनीच्या माध्यमातून 3 री व ४ थी च्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी ग्रामीण भागातील पालकांची कोरोणा मुळे आर्थिक दुरावस्था झाली असली तरी त्यांच्या मदतीला औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर येत असते. माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र भांडवलकर यांच्या प्रयत्नांमुळे शाळेला टॅब मिळण्यास मदत झाली असून त्यांच्या या कार्याबाबत उपस्थितांनी अभिनंदन केले तर पालकांनी आभार व्यक्त केले. यावेळी केमिस्टाँल कंपनीचे आनंद सर, वाबळे सर,रोटरी क्लबचे आशिष सर,अभ्यंकर सर, मा.ग्रा. पं. सदस्य सुरेंद्र भांडवलकर सर, गा.पं. सदस्य जयश्री गव्हाणे,दिपक गव्हाणे,कावेरी देवकर, सुरेश पटाईत, चव्हाण सर,काटे मँडम उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रांत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चांगल्या लोकांमुळे अडचणी दूर होत असतात. नरेश्वर वस्ती जि.प.प्राथमिक शाळेची डिजिटल स्कूल कडे वाटचाल सुरू झाली आहे. – सुरेंद्र भांडवलकर,माजी ग्राम पंचायत सदस्य, कोरेगाव भीमा