Friday, July 12, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?रिद्धी सिद्धीची देवता असणाऱ्या गणेशाचा आपण विनोद करून टाकला आहे - संग्राम...

रिद्धी सिद्धीची देवता असणाऱ्या गणेशाचा आपण विनोद करून टाकला आहे – संग्राम महाराज भंडारे

डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील कीर्तनात समाज प्रबोधनकार संग्राम महाराज भंडारे यांनी आपण अल्ली संस्कृती टिकवायला हवी, संस्कृतीतील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून अयोग्य गोष्टी सोडायला हव्यात.आपल्या देवदेवतांचे विद्रुपीकरण आपणच थांबवायला हवे.बुद्धीची, मांगल्याची देवता, रिद्धी सिद्धीची देवता असणाऱ्या गणेशाचा आपण विनोद करून टाकला आहे हे थांबायला हवं असे कळकळीचे आवाहन ह.भ.प.संग्राम महाराज भंडारे यांनी उपस्थितांना केले.

तिरंगा स्पोर्ट क्लब यांच्या वतीने ह.भ.प.संग्राम महाराज भंडारे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होतेय हिंदू संस्कृती व तिच्या विषयी आपले कर्तव्य याविषयी भंडारे महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत भागवत धर्माचे महत्व सांगितले. गणपती समोर कसलाही संबंध नसलेली गाणी आपण लावतो आणि त्यावर नाचतो हे योग्य नाही.काही दिवसांनी भिंती पाडण्यासाठी जे सी बी नाही तर डीजे ची थप्पी आणून भिंती पाडाव्या लागतील, डी जे वाजवून ,भिंती पाडून मिळतील अशी जाहिरात करावी लागेल असे मत व्यक्त करत डिजे व आधुनिक गाणी याविषयी नाराजी व्यक्त करत आपण हिंदू संस्कृती जपायला हवी असे आवाहन ह.भ.प.संग्राम महाराज भंडारे यांनी केले.

डिंग्रजवाडी येथील तिरंगा स्पोर्ट क्लब गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात.महिलांना अष्टविनायक दर्शन असो की खेळ पाठणीचा, कीर्तनातून समाजप्रबोधन याबरोबरच भोजनाचा उपक्रम राबवत असून नागरिकांच्या आनंदासाठी व भावी पिढी चांगली घडावी यासाठी विविधांगी उपक्रम राबवत असतात.

यावेळी तिरंगा स्पोर्ट क्लब मंडळाचे अध्यक्ष व माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे,उपाध्यक्ष विशाल गव्हाणे, खजिनदार अमोल गव्हाणे,सचिव राहुल गायकवाड, कार्याध्यक्ष अवधूत गव्हाणे-कार्याध्यक्ष ,सभासद ऋषिकेश चव्हाण,राहुल गव्हाणे ,अतुल गव्हाण, अभिजीत गव्हाणे, कृष्णा गव्हाणे , नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!